15 जानेवारीची ‘यूजीसी नेट’ परीक्षा पुढे ढकलली
येत्या 15 जानेवारी रोजी होणारी ‘यूजीसी नेट परीक्षा’ पुढे ढकलण्यात आली आहे. मकर संक्रांती, पोंगल व लोहडी यांसारख्या सणांच्या पार्श्वभूमीवर बुधवारच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल केला आहे. मात्र इतर परीक्षा नियोजित वेळेनुसार होतील, असे राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेने (एनटीए) सोमवारी जाहीर केले.
15 जानेवारीची पुढे ढकललेली परीक्षा नंतर कधी होईल हे एनटीएने अद्याप जाहीर केलेले नाही. एनटीए 85 विषयांसाठी यूजीसी नेट परीक्षा घेत आहे. 3 जानेवारीला सुरू झालेली परीक्षा 16 जानेवारी रोजी संपणार होती. मात्र, देशाच्या दक्षिण भागात 15 व 16 जानेवारी रोजी पोंगल सण साजरा केला जात आहे. त्या पार्श्वभूमीवर तामीळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन व अनेक खासदारांनी नेट परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केली होती. त्यानुसार एनटीएने 15 जानेवारीची परीक्षा पुढे ढकलली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List