जम्मू-कश्मीरमधील नौशेरा येथे स्फोट; लष्कराचे 6 जवान जखमी

जम्मू-कश्मीरमधील नौशेरा येथे स्फोट; लष्कराचे 6 जवान जखमी

जम्मू कश्मीरच्या नौशेरा येथे भूसुरुंगाचा स्फोट झाला आहे. भवानी सेक्टरमधील माकडी भागात झालेल्या स्फोटात लष्कराचे 6 जवान जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी राजौरी येथील सैन्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जम्मू आणि काश्मीरमधील नौशेरा येथे भूसुरुंगाचा स्फोट झाला आहे. भवानी सेक्टरमधील माकडी भागात स्फोट झाला आहे. त्यात लष्कराचे 6 जवान जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी राजौरी येथील सैन्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याआधी 9 डिसेंबर 2024 रोजी जम्मूतील पूंछ येथे स्फोट झाला होता, ज्यामध्ये एक सैनिकाला वीरमगण आले होते.

पूंछमधील ठाणेदार टेकरी येथे गस्त घालत असताना भूसुरुंग स्फोटात 25 राष्ट्रीय रायफल्सचे हवालदार व्ही. सुब्बैया वारीकुंता यांना वीरमरण आले होते. तसेच बारामुल्ला जिल्ह्यातील पट्टनमधील पलहल्लन भागात एक आयईडी निकामी करण्यात आला. पाटणमधील पलहल्लनमध्ये सुरक्षा दलांना आयईडी आढळून आला. घटनास्थळी बॉम्ब निकामी पथक पाठवण्यात आले आणि आयईडी निकामी करण्यात आला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कुंभस्नानासाठी गेलेले महेश कोठे यांचे निधन कुंभस्नानासाठी गेलेले महेश कोठे यांचे निधन
सोलापूरचे माजी महापौर महेश विष्णूपंत कोठे (वय 59) यांचे आज हृदयविकाराने निधन झाले. प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्यासाठी गेले असताना त्यांना...
कॅलिफोर्नियातील नवीन जंगलांना भीषण आगीचा धोका
इमारतींमध्ये सोलर पॅनल बसवल्यास मालमत्ता करात 2 टक्के सूट मिळणार
HMPV विषाणूसंदर्भात WHO ची मोठी माहिती, जाणून घ्या
उच्च कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी ‘या’ 3 पद्धतीने लसणाचे करा सेवन
Kho Kho World Cup 2025 – टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरूच, ब्राझीलला धुळ चारत बादफेरीच्या दिशेने टाकले पाऊल
कुंभमेळ्याच्या योजनेबाबत स्टीव्ह जॉब्स यांनी लिहिलेल्या पत्राची 4.32 कोटींना विक्री