कोण म्हणतं मी संन्यास घेतलाय! व्हायरल साध्वी’ने कुंभमेळ्यात वेधलं साऱ्यांचं लक्ष

कोण म्हणतं मी संन्यास घेतलाय! व्हायरल साध्वी’ने कुंभमेळ्यात वेधलं साऱ्यांचं लक्ष

महाकुंभ मेळा 13 जानेवारीपासून उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू झाला आहे. या महाकुंभासाठी पहिल्या दिवशी भाविकांचा प्रचंड जनसमुदाय पाहायला मिळाला. देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक या महाकुंभासाठी आले आहेत. मात्र यावेळी सर्वांचे लक्ष एका महिलेने वेधले. सौंदर्यामुळे सोशल मीडियावर तिच्या फोटोंची चर्चा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साध्वी हर्षा रिचारिया असे या महिलेचे नाव आहे. हर्षा यांनी देखील या महाकुंभ मेळ्यात सहभाग घेतला आहे. महाकुंभातील त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत आणि व्हायरल होत आहेत. संपत्ती आणि ग्लॅमरस जगाचा निरोप घेऊन कुंभमेळ्यात सहभागी झाल्याचे हर्षा यांनी सांगितले. हर्षा रिचारिया यांनी स्वत:ला साध्वी मानण्यास नकार दिला. माझे फोटो व्हिडीओ व्हायरल होतायत. त्यात मला सोशल मीडियावर “साध्वी” नाव दिले गेले आहे, परंतु हे योग्य नाही. कारण मी अजूनही हे पूर्णपणे स्वीकारलेले नाही, असे त्या म्हणाल्या.

सोशल मीडियावर लोकांनी त्यांना सन्यास घेऊन कुंभमेळ्यात आल्याचे म्हटले आहे. यावर त्यांनी आपले मत मांडले. “मी सन्यास घेतला असे कोण म्हणाले? जेव्हा तुमच्या मनातील श्रद्धा वाढते, तेव्हा तुम्ही कोणतेही रूप घेऊ शकता. मला हे (संन्यासी) रूप दोन वर्षांपासून घ्यायचे होते. परंतु माझ्या कामामुळे मी ते करू शकले नाही. आता मला संधी मिळाली आहे, असे त्यांनी सांगितले.

का घेतला ग्लॅमरल दुनियेचा निरोप

काही गोष्टी आपल्या नशिबात लिहिलेल्या असतात. आपल्या काही कर्माचे आणि जन्माचे फळ आहेत, जे आपल्याला या जन्मात मिळतात. आपल्या आयुष्याला कोणते वळण कधी लागेल, हे आधीच ठरलेले आहे. मी देश-विदेशात शो केले आहेत. अँकरिंग आणि अभिनय केला आहे. पण गेल्या एक ते दीड वर्षांपासून मी अध्यात्म, साधनेशी जोडले गेले आहे. त्यामुळे मी आधीच्या आयुष्याला पूर्णविराम दिलाय. आणि आत्ताचं जीवन जगत आहे, असे हर्षा रिचारिया म्हणाली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कुंभस्नानासाठी गेलेले महेश कोठे यांचे निधन कुंभस्नानासाठी गेलेले महेश कोठे यांचे निधन
सोलापूरचे माजी महापौर महेश विष्णूपंत कोठे (वय 59) यांचे आज हृदयविकाराने निधन झाले. प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्यासाठी गेले असताना त्यांना...
कॅलिफोर्नियातील नवीन जंगलांना भीषण आगीचा धोका
इमारतींमध्ये सोलर पॅनल बसवल्यास मालमत्ता करात 2 टक्के सूट मिळणार
HMPV विषाणूसंदर्भात WHO ची मोठी माहिती, जाणून घ्या
उच्च कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी ‘या’ 3 पद्धतीने लसणाचे करा सेवन
Kho Kho World Cup 2025 – टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरूच, ब्राझीलला धुळ चारत बादफेरीच्या दिशेने टाकले पाऊल
कुंभमेळ्याच्या योजनेबाबत स्टीव्ह जॉब्स यांनी लिहिलेल्या पत्राची 4.32 कोटींना विक्री