‘त्याचा निष्काळजीपणा दिसतो, बसमध्ये कोणताही दोष दिसत नाही’; कुर्ला अपघातातील चालकाला न्यायालयाने जामीन नाकारला

‘त्याचा निष्काळजीपणा दिसतो, बसमध्ये कोणताही दोष दिसत नाही’; कुर्ला अपघातातील चालकाला न्यायालयाने जामीन नाकारला

गेल्या महिन्यात कुर्ला येथे झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी सत्र न्यायालयाने बस चालकाला जामीन नाकारला आहे. जामीन नाकारतानाच ‘बेस्ट बसचा चालक बेपर्वाईने आणि निष्काळजीपणाने गाडी चालवत होता आणि गाडीत काही बिघाड होता हे मानणे कठीण आहे’, असे निरिक्षण सत्र न्यायालयाने नोंदवल्याचे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एम. पठाडे यांनी 10 जानेवारी रोजी आरोपी चालक संजय मोरे (54) यांचा जामीन अर्ज फेटाळला.

मंगळवारी उपलब्ध झालेल्या सविस्तर आदेशानुसार, अपघात बसमधील तांत्रिक/यांत्रिक बिघाडामुळे झाला असा मोरे यांचा युक्तिवाद न्यायालयाने मान्य करण्यास नकार दिला. जरी मोरे यांनी हा अपघात बसच्या खराब देखभालीमुळे किंवा ब्रेक निकामी झाल्यामुळे किंवा यांत्रिक किंवा तांत्रिक दोषामुळे झाला असा दावा केला असला तरी, या युक्तिवादाला प्रथमदर्शनी समर्थन देणारे कोणतेही पुरावे नाहीत, असे न्यायालयाने म्हटले आहे.

आरटीओ (प्रादेशिक परिवहन कार्यालय) ने जारी केलेल्या अहवालात प्रथमदर्शनी बसमध्ये कोणताही यांत्रिक बिघाड नसल्याचे दिसून येते, असे त्यात म्हटले आहे.

या बसमध्ये कोणताही यांत्रिक/तांत्रिक बिघाड किंवा ब्रेक फेल झाला होता ज्यामुळे ही दुर्दैवी दुर्घटना घडली असे मानणे कठीण आहे, असे मत न्यायालयाने नोंदवल्याचे या वृत्तात म्हटले आहे.

चालकाच्या निष्काळजीपणामुळे केवळ बसमधील प्रवाशांचेच नव्हे तर रस्त्यावर असलेल्या प्रवाशांचेही जीव धोक्यात आले, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.

‘प्रथमदर्शनी असे दिसून आले आहे की अर्जदार आरोपी हा रस्ता वापरत असताना आणि बसमध्ये अनेक प्रवासी होते तरीही तो अतिशय बेफिकीरपणे आणि निष्काळजीपणे बस चालवत होता’, असे आदेशात म्हटले आहे.

‘गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता आणि आरोपीवर गुन्हा दाखल असलेल्या गुन्ह्यांसाठी देण्यात आलेल्या शिक्षेचा विचार करता, आरोपीला जामिनावर सोडणे मला योग्य वाटत नाही’, असे न्यायाधीशांनी म्हटले आहे.

9 डिसेंबर रोजी बेस्ट उपक्रमाद्वारे चालवण्यात येणारी इलेक्ट्रिक बस कुर्ला रेल्वे स्थानकाजवळील गर्दीच्या रस्त्यावर पादचाऱ्यांना आणि वाहनांना धडकली. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आणि 40 हून अधिक जण जखमी झाले.

त्याच रात्री मोरे यांना अटक करण्यात आली आणि भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. जामीन मागताना मोरे यांनी दावा केला की ते एक व्यावसायिक चालक आहेत आणि हा अपघात बसमध्ये अचानक आणि अनपेक्षित यांत्रिक किंवा तांत्रिक बिघाडामुळे झाला. मात्र सरकारी वकिलांनी आरटीओच्या अहवालाचा आधार घेत स्पष्टपणे सांगितले की बसमध्ये कोणताही दोष नव्हता.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आकाला धक्का! कराडला मोक्का!! समर्थकांकडून बंद, हिंसाचार, जाळपोळ… परळीत तणाव आणि भीती आकाला धक्का! कराडला मोक्का!! समर्थकांकडून बंद, हिंसाचार, जाळपोळ… परळीत तणाव आणि भीती
राज्यभरात होणारी छिःथू, देशमुख कुटुंबाने दिलेला निर्वाणीचा इशारा यामुळे खंडणी प्रकरणात कोठडीत असलेल्या वाल्मीक कराडला अखेर ‘मकोका’ लावण्यात आला असून...
देशात अनेक गृहमंत्री झाले पण त्यांच्यापैकी कोणी तडीपार झाले नव्हते, शरद पवार यांचा अमित शहांवर हल्ला
शक्तिपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांवर सक्ती, प्रकल्पासाठी 27 हजार एकर जमीन संपादित करणार
कश्मीरमध्ये एलओसीजवळ स्फोट हिंदुस्थानचे सहा जवान जखमी
बेकायदेशीर भोंग्यांवर काय कारवाई केली? हायकोर्टाचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश
मुद्दा – ‘एचएमपीव्ही’ला घाबरू नका!
लेख – पास-नापासापेक्षा कौशल्य महत्त्वाचे!