संतोष देशमुख हत्याप्रकरणी वाल्मीक कराडचा SIT ने ताबा घेतला; बुधवारी न्यायालयात हजर करणार
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी अखेर वाल्मीक कराडवर मकोकातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाल्मीक कराडवर मकोका लावावा, अशी देशमुख कुटुंबीयांसह सर्वपक्षीय नेत्यांची मागणी होती. याआधी वाल्मीक कराड खंडणी प्रकरणात पोलिसांना शरण आला होता. त्याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी जोर धरत होती. त्यासाठी देशमुख यांच्या भावाने सोमवारी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं होतं. त्यानंतर आता वाल्मीक कराडवर मकोकातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे. या सातही आरोपींना मकोका लावण्यात आला आहे.
खंडणीच्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर वाल्मीक कराडला आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात एसआयटीने ताब्यात घेतलं आहे. त्याची परवानगी एसआयटीने मिळाली आहे. या प्रकरणी एसआयटीकडून कराडला बुधवारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे. वाल्मीक कराडला हत्या प्रकरणात किती दिवसांची कोठडी मिळते, ते बुधवारी स्पष्ट होणार आहे.
न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर वाल्मीक कराडला बीडमध्ये नेण्यात आलं. मात्र त्याच्यावर मकोका गुन्हा दाखल झाल्यानंतर एसआयटीने प्रोडक्शन वॉरंट दाखवून त्याचा ताबा घेतला. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडचा सहभाग असल्याचा पुरावा असल्याचा दावा एसआयटीने केल्याची माहिती मिळाली आहे. या आधी खंडणीच्या गुन्ह्यातही एसआयटीकडेच त्याचा ताबा होता. वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर त्याला पहिल्यांदा तुरुंगात नेलं गेलं. त्यानंतर एसआयटीकडून त्याला हत्येच्या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलं.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List