मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ती मुलाखत ‘पेड’
भारतीय जनता पक्षाकडून खासगी मीडियाला ताब्यात घेण्याचा प्रकार नवीन नाही. पण आता सरकारच्या अखत्यारीतील दूरदर्शनवरही सरकारचा दबाव वाढला आहे. त्याचे ताजे उदाहरण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अलीकडेच झालेली मुलाखत. ती मुलाखत एखाद्या पत्रकाराकडून घ्यायला हवी होती. पण फडणवीसांची मुलाखत चक्क भारतीय जनता पक्षाचे मीडिया प्रमुख नवनाथ बन यांनी घेतली. त्यावरून टीका होऊ लागली आहे.
Devendra Fadnavis’s Doordarshan Interviewer Was the Head of the BJP’s Cell. Right to Information replies by Doordarshan to The Wire say that Ban was allowed to interview the chief minister – and paid for it – as part of its “talent/artist” booking system”. https://t.co/vozKhmkI12
— Prashant Bhushan (@pbhushan1) January 13, 2025
बन यांनी ही मुलाखत घेतली आणि त्यासाठी त्यांना दूरदर्शनकडून बिदागीही देण्यात आली. हे गुपित माहितीच्या अधिकारात उघड झाले. ती ‘पेड’ मुलाखत होती अशी टीका प्रशांत भूषण यांनी सोशल मीडियावर केली आहे. बन यांनी त्या मुलाखतीत फडणवीस यांना सोयीचे प्रश्न विचारले. त्यांनीच मुलाखत घ्यावी यासाठी सरकारकडून अगदी केंद्रातूनही दबाव आणल्याचे सांगितले जाते. भाजपचा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हा अत्याचार असल्याचेही बोलले जात आहे.
मुख्यमंत्री झाल्यानंतर मा. देवेंद्रजी फडणवीस यांची पहिली मुलाखत घेण्याची संधी दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर मिळाली. वेळ काढून ही मुलाखत नक्की ऐका
देवाभाऊंचं व्हिजन
महाराष्ट्र मिशन!https://t.co/DepJJNAxaO pic.twitter.com/aBmCZ9vfNv— Navnath Kamal Uttamrao Ban (@NavnathBanBJP) December 6, 2024
मा.मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतरची पहिली विशेष मुलाखत…
यूट्यूब लिंक..https://t.co/Kteq2lnBgc
Doordarshan Sahyadri@Dev_Fadnavis @MahaDGIPR @PIBMumbai @MyGovMarathi pic.twitter.com/Enj8Uzl9n9— Doordarshan Sahyadri (@DDSahyadri) December 6, 2024
भाजपचे राष्ट्रीय अधिवेशन २०२४ नवी दिल्ली येथे सुरू आहे. त्याची क्षणचित्रे pic.twitter.com/RaleR5qFTq
— Navnath Kamal Uttamrao Ban (@NavnathBanBJP) February 18, 2024
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List