वृद्ध जोडप्यांमध्ये स्वतंत्र घरामध्ये राहण्याचा ट्रेंड

वृद्ध जोडप्यांमध्ये स्वतंत्र घरामध्ये राहण्याचा ट्रेंड

वृद्धापकाळात एकमेकांची काठी बनून राहण्याचे दिवस संपले असून ब्रिटन, अमेरिका, नेदरलँड्स आणि कॅनडासारख्या देशांत आता वृद्ध जोडप्यांमध्ये स्वतंत्र घरामध्ये राहण्याचा नवा ट्रेंड पाहायला मिळत आहे. यूके हाऊसहोल्ड लाँगिटयुडिनल स्टडीच्या पाहणीतून हा निष्कर्ष समोर आला असून याला ‘लिव्हिंग अपार्ट बट टुगेदर’ असे म्हटले जात आहे. याचा अर्थ हे वृद्ध जोडपे एकमेकांसोबत राहत असूनदेखील वेगवेगळ्या घरात राहण्याला पसंती देत आहेत. यामुळे त्यांना मानसिक व भावनात्मकदृष्टय़ा लाभ मिळत असल्याचे बोलले जात आहे. एका छताखाली राहून लहानसहान भांडणे व मतभेद वाढण्याचा धोका असतो. परंतु वेगळे राहून प्रेम व ओलावा यांची जाणीव जास्त बळकट होते, असे या दांपत्यांचे म्हणणे आहे. यूके हाऊसहोल्ड लाँगिटयुडिनल स्टडीचा हा अहवाल 2011 ते 2023 या काळातील असून अभ्यासातून जवळपास एक लाखाहून अधिक वृद्ध दांपत्यांची मते जाणून घेण्यात आली आहेत. ही व्यवस्था स्वतःला आणि जोडीदारालाही सुखद अनुभव देणारी आहे. महिलांना आपल्या स्वप्नानुसार जगण्याचे स्वातंत्र्य मिळते, असे त्यांचे म्हणणे आहे.

घटस्फोटाचा धोका कमी

वृद्ध दांपत्यांनी एकाच घरात वेगवेगळे राहणे अनेक वेळा मानसिक आरोग्यासाठी आव्हानात्मक ठरू शकते, परंतु वेगळे राहिल्याने समस्या कमी होते. तसेच घटस्फोटाचा धोका कमी होतो. मिरियम मार्गोलीस व हिथर सदरलँड हे जोडपे 12 वर्षांपासून वेगळे राहतात. हेलेना बोनहम कार्टर व टिम बर्टन यांची जोडी 13 वर्षांपासून वेगवेगळ्या घरांत राहून आपले नाते इमानेइतबारे निभावण्याचा प्रयत्न करतात.

हा ट्रेंड पसरतोय

जगात सर्वात आधी ब्रिटनसारख्या पुढारलेल्या देशात सुरू झालेला वृद्ध दांपत्यांचा हा ट्रेंड आता हळूहळू ब्रिटनव्यतिरीक्त इतर देशांमध्येसुद्धा पसरत आहे. अमेरिका, नेदरलँड्स, कॅनडा यांसारख्या देशांत हा ट्रेंड पाहायला मिळत आहे. कॅनडात तर तरुणांनीही ही व्यवस्था स्वीकारली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कुंभस्नानासाठी गेलेले महेश कोठे यांचे निधन कुंभस्नानासाठी गेलेले महेश कोठे यांचे निधन
सोलापूरचे माजी महापौर महेश विष्णूपंत कोठे (वय 59) यांचे आज हृदयविकाराने निधन झाले. प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्यासाठी गेले असताना त्यांना...
कॅलिफोर्नियातील नवीन जंगलांना भीषण आगीचा धोका
इमारतींमध्ये सोलर पॅनल बसवल्यास मालमत्ता करात 2 टक्के सूट मिळणार
HMPV विषाणूसंदर्भात WHO ची मोठी माहिती, जाणून घ्या
उच्च कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी ‘या’ 3 पद्धतीने लसणाचे करा सेवन
Kho Kho World Cup 2025 – टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरूच, ब्राझीलला धुळ चारत बादफेरीच्या दिशेने टाकले पाऊल
कुंभमेळ्याच्या योजनेबाबत स्टीव्ह जॉब्स यांनी लिहिलेल्या पत्राची 4.32 कोटींना विक्री