Team India ला खराब कामगिरीचं फळ मिळणारं! BCCI च्या आढावा बैठकीत मोठा निर्णय
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये 3-1 आसा पराभव पत्करावा लागल्यामुळे टीम इंडियाचे जागतिक कसोटी चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये पोहोचण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. तसेच न्यूझीलंडविरूद्धही टीम इंडियाची कामगिरी अत्यंत खराब राहिली होती. टीम इंडियाच्या खराब कामगिरीवर संघ व्यवस्थापनाने नाराजी व्यक्त केली आहे. नुकत्याच झालेल्या बीसीसीआयच्या आढावा बैठकीत काही कठोर निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानुसार खेळाडूंच्या कामगिरीवर आधारीत मोबदला देण्याच्या विचार बीसीसीआय आहे.
BCCI तर्फे घेण्यात आलेल्या बैठकीत कर्णधार रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि चीफ सिलेक्टर अजित आगरकर उपस्थित होते. या बैठकीत खेळाडूंच्या कामगिरीवर आणि वेतनासंदर्भात चर्चा झाली. खेळाडूंना त्यांच्या कामगिरीनुसार पैसे दिले जाणार आहेत. याचा अर्थ, जशी कामगिरी तेव्हढेच पैसे दिले जातील, अशी चर्चा बैठकीत झाल्याचे इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तात म्हटले आहे. खेळाडूंनी अधिक जबाबदारीने आणि खेळाचे महत्त्व लक्षात घेण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
हिंदुस्थानी खेळाडूंना सध्या प्रत्येक कसोटी खेळण्यासाठी 15 लाख रुपये मिळतात. याशिवाय त्यांना चांगल्या कामगिरीसाठी वेगळे पैसेही मिळतात. दरम्यान, BCCI च्या बैठकीत झालेला निर्णय हा खेळाडूंच्या कामगिरीनुसार पैसे कमी करण्याबाबत आहे की सामना शुल्काबाबत, हे अद्याप समजलेले नाही.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List