Walmik Karad surrender – वाल्मीक कराड शरण येण्याची शक्यता; पुण्यातील CID मुख्यालयाबाहेर बंदोबस्त वाढवला
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून नाव पुढे आलेला आणि खंडणीच्या गुन्ह्यातही पोलिसांना हवा असलेला वाल्मीक कराड शरण येण्याची शक्यता आहे. पुण्यातील सीआयडी मुख्यालयात तो आत्मसमर्पण करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे सीआयडी मुख्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. त्यांना हालहाल करून मारण्यात आले. या हत्याकांडापासून वाल्मीक कराड फरार आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात वाल्मीक कराडला अटक झाल्याचे वृत्तही आले होते. मात्र सीआयडीने हे वृत्त फेटाळून लावले होते. आता पुन्हा एकदा वाल्मीक कराड स्वत:हून सीआयडी मुख्यालयात आत्मसमर्पण करणार असल्याचे वृत्त आहे. यामुळे सीआयडी मुख्यालयाबाहेर पुणे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
हे वाचा – सीआयडी बिनकामाची, 15 दिवस नुसत्या चौकश्या, फडणवीस-मुंडेंच्या मैत्रीचा तपासावर परिणाम
हे वाचा – मला वाचवा! धनंजय मुंडेंनी घेतली फडणवीसांची भेट
हे वाचा – परळीत कशाला, अंबाजोगाईत राहू! ‘आका’च्या दहशतीने स्थलांतर वाढले
सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या समोर सीआयडीचे मुख्यालय आहे. या मुख्यालयाबाहेर एरव्ही साध्या वेशातील पोलीस किंवा सीआयडीचे कर्मचारी असतात. मात्र आता येथे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पुणे पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल, गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे हे देखील सीआयडी मुख्यालयात दाखल झाले आहेत.
Walmik Karad surrender – पुण्यातील CID मुख्यालयाबाहेर बंदोबस्त वाढवला; वाल्मीक कराड शरण येण्याची शक्यता pic.twitter.com/hZkLX2z6PX
— Saamana Online (@SaamanaOnline) December 31, 2024
शेवटचे लोकेशन उज्जैन
दरम्यान, फरार वाल्मीक कराडच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन 13 डिसेंबरला मध्य प्रदेशमधील उज्जैनचे असल्याचे समोर आले आहे. वाल्मीक कराडने स्वत: त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर या देवदर्शनाचे फोटो शेअर केले होते. वाल्मीकने 11 डिसेंबरला महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. त्यानंतर दोन दिवसांनी त्याचा फोन बंद झाल्याचे समजते.
वाल्मीक कराडचे शेवटचे लोकेशन उज्जैनचे, महाकालचे घेतले होते दर्शन
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List