Kho-Kho World Cup 2025 – हिंदुस्थानची विजयी सलामी, नेपाळचा केला 42-37 असा पराभव

Kho-Kho World Cup 2025 – हिंदुस्थानची विजयी सलामी, नेपाळचा केला 42-37 असा पराभव

हिंदुस्थानची राजधानी दिल्लीमध्ये इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये पहिल्यावहिल्या खो-खो विश्वचषकाला सुरुवात झाली. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. स्पर्धेतमध्ये 23 देशांमधील 39 संघांनी सहभाग नोंदवला आहे. पहिला सामना हिंदुस्थान आणि नेपाळ यांच्यामध्ये खेळवला गेला. नेपाळने कडवी झूंज देत विजयश्री खेचून आणण्याचा प्रयत्न केला, परंतु हिंदुस्थानने त्यांचे मनसुबे उधळून लावत स्पर्धेत विजयी सलामी दिली.

हिंदुस्थान विरुद्ध नेपाळ या उद्घाटनीय सामन्यात नेपाळने हिंदुस्थानला चांगली लढत दिली. अनुभवी हिंदुस्थानी खेळाडूंपुढे नेपाळचा निभाव लागणार नाही, अशी चाहत्यांना अपेक्षा होती. परंतु नेपाळने दमदार खेळ करत सामन्यात रंगत निर्माण केली. मध्यंतरापर्यंत 24-20 अशा फरकाने हिंदुस्थानचा संघ पुढे होता. परंतु नेपाळच्या खेळाडूंनी सुद्दा तितक्याच ताकदीने खेळ करत, लीड वाढवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना यश आले नाही. अखेर हिंदुस्थानने नेपाळचा 42-37 अशा फरकाने पराभव केला आणि स्पर्धेत विजयी सलामी दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

का नाही झालं सलमान खानचं लग्न? अभिनेत्याच्या वडिलांकडून मोठा खुलासा का नाही झालं सलमान खानचं लग्न? अभिनेत्याच्या वडिलांकडून मोठा खुलासा
Salman Khan Marriage: सलमान खानचं रिलेशनशिप स्टेटस बॉलिवूडपासून सोशल मीडियापर्यंत चर्चेचा असतो आणि आजही तो एलिजिबल बॅचलर मानला जातो. सलमान...
सुब्रमण्यनवर संतापून ‘मेंटल हेल्थ मॅटर्स’ म्हटलेली दीपिकाही अनुभवला असा काही अनुभव
विवाहित कुमार सानू यांच्यासोबत पत्नीसारखी राहायची ही प्रसिद्ध अभिनेत्री; 5 वर्षे केलं डेट
सचिन तेंडुलकरची लेक की सौरव गांगुलीची लेक, कोण आहे उच्च शिक्षित?
बॉलिवूडची ‘ती’ अभिनेत्रीने जिने लग्नाआधी क्रिकेटरच्या मुलीला दिला जन्म, मात्र त्याने सोडली साथ
दिग्दर्शकाने कट बोलल्यावरही किस करत राहिला; ‘त्या’ व्हिडीओमुळे वरूण धवन चांगलाच ट्रोल
‘आताच उमराह केला अन् आता मंदिरात..’; सिद्धिविनायक मंदिरात गेल्याने हिना खान ट्रोल