महायुती सरकारवर नामुष्की, 120 कोटींची बिले थकवल्याने केईएम, शीव आणि नायर रुग्णालयांचा औषध पुरवठा बंद

महायुती सरकारवर नामुष्की, 120 कोटींची बिले थकवल्याने केईएम, शीव आणि नायर रुग्णालयांचा औषध पुरवठा बंद

मुंबई महानगरपालिकेने औषध पुरवठा करणाऱया 150 पंत्राटदारांचे तब्बल 120 कोटी थकवल्याने पंत्राटदारांनी केईएम, शीव, नायरसह तब्बल 27 रुग्णालयांत आजपासून औषध पुरवठा बंद केला आहे. त्यामुळे पालिकेच्या रुग्णालयांत औषध आणीबाणी निर्माण झाली असून उपचारासाठी येणाऱया शेकडो गोरगरीब-सर्वसामान्य रुग्णांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. प्रशासकाच्या माध्यमातून पालिकेचा कारभार हाकणाऱया राज्य सरकारवर यामुळे मोठी नामुष्की ओढावली आहे.

पालिकेच्या रुग्णालयांमध्ये मोफत आणि अद्ययावत उपचार मिळत असल्याने केवळ मुंबईतून नव्हे, तर महाराष्ट्र आणि देशाच्या कानाकोपऱयातून शेकडो रुग्ण पालिकेच्या रुग्णालयांत उपचारासाठी दररोज येत असतात. या रुग्णांना सर्व सुविधा मोफत देण्याचे पालिकेचे धोरण आहे. मात्र यामध्ये अनेक चाचण्यांसाठी खासगी लॅबमध्ये पैसे खर्च करावे लागतात. याबाबत वारंवार आवाज उठवूनही पालिका प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होत नाही. यातच आता पंत्राटदारांनी औषध पुरवठाही बंद केल्याने गोरगरीब रुग्णांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

रुग्णालयांत औषध पुरवठा बंद केल्याने पालिका प्रशासनाने अतिरिक्त आयुक्त स्तरावर सर्व डीन, अकाऊंट ऑफिसर यांची आज तातडीची बैठक झाली. थकीत पैसे तातडीने देण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्तांनी दिले. याबाबत पंत्राटदारांच्या असोसिएशनलाही पालिकेने पैसे ठरावीक दिवसांत देण्याची लिखित हमी देण्यात आली आहे. याबाबत असोसिएशनसोबत चर्चाही झाली आहे. त्यामुळे ते औषध पुरवठा सुरू ठेवतील, असे आरोग्य उपायुक्त संजय कुऱहाडे यांनी सांगितले. दरम्यान, याबाबत आता असोसिएशन कोणती भूमिका घेते याकडे लक्ष लागले आहे.

पालिका रुग्णालयांत नियमितपणे औषधांचा पुरवठा केला जात असताना गेल्या सहा महिन्यांपासून प्रशासनाने बिले दिली नाहीत. यामध्ये एक कोटीपासून तीन कोटींपर्यंत रक्कम रखडली आहे. बिल मागितले, तर पालिका प्रशासनाकडून तांत्रिक कारण सांगितले जाते. म्हणून आता बिले मिळत नाही तोपर्यंत औषध पुरवठा बंद राहील.
– अभय पांडय़ा, अध्यक्ष, ऑल इंडिया ड्रग्ज सप्लायर्स असोसिएशन

पालिकेच्या दिरंगाईचा फटका

– केईएम, नायर आणि कूपर या महत्त्वाच्या रुग्णालयांसह 27 रुग्णालयांमध्ये 150 पंत्राटदारांकडून औषध पुरवठा केला जातो.
– मात्र तब्बल सहा महिन्यांपासूनची बिले थकल्याने आता आमच्याकडे पैसेच नसल्याचे पंत्राटदारांचे म्हणणे आहे.
– रेग्युलर औषध सप्लायचे पैसे गेल्या सहा महिन्यांपासून, तर डिपॉझिट, व्हिजिलन्सचे पैसे चार वर्षांपासून थकीत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘कारागृहातील आरोपी आमदाराच्या फार्म हाऊसवर जातो…’, गणपत गायकवाड यांच्यावर महेश गायकवाड यांचा आरोप ‘कारागृहातील आरोपी आमदाराच्या फार्म हाऊसवर जातो…’, गणपत गायकवाड यांच्यावर महेश गायकवाड यांचा आरोप
उल्हासनगरच्या हिललाईन पोलिस ठाण्यात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना नेते महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता. या प्रकरणात माजी...
मोठी बातमी! वाल्मिक कराडची प्रकृती खालावली
शाहरूख खानला चक्क एका मराठी अभिनेत्यासोबत लग्न करायचं होतं; फोनवर केलं होतं प्रपोज
बॉयफ्रेंडसोबतचा MMS लीक अन् राजघराण्यातील या बॉलिवूड अभिनेत्रीचं आयुष्य, करिअर सगळंच उद्ध्वस्त
माधुरीकडे स्पोर्ट्स कारपासून ते मर्सिडीजपर्यंत महागडं कलेक्शन; आता अजून एका लक्झरी कारची एन्ट्री
Relationship Tips: खरचं तिला तुम्ही आवडता का? ही लक्षणं सांगतील तिच्या मनातल्या गोष्टी…
Champions Trophy पूर्वी जसप्रीत बुमराहला मिळाला मोठा सन्मान, ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराला टाकले मागे