इंद्रायणीत सांडपाणी सोडणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करा! आदित्य ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

इंद्रायणीत सांडपाणी सोडणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करा! आदित्य ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाचा विषय दिवसेंदिवस गंभीर होत आहे. स्थानिकांच्या आणि भाविकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतोय. त्यामुळे राज्य सरकारने याची तत्काळ दखल घेऊन प्रक्रिया न करता नदीत रासायनिक सांडपाणी सोडणाऱया कारखान्यांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतून प्रक्रिया न केलेल्या रासायनिक सांडपाण्यामुळे इंद्रायणी नदी दूषित झाली आहे. दैनिक ‘सामना’मध्ये सोमवारी याबाबत ‘इंद्रायणीत पुन्हा विषारी फेसाचा पूर’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध झालेल्या बातमीचा दाखला देत आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडिया ‘एक्स’वरून सरकारवर जोरदार टीका केली आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, गेल्या वर्षीसुद्धा हा मुद्दा आम्ही प्रशासनाच्या दृष्टीस आणून दिला होता. पण त्यानंतरही कार्यवाही शून्यच! यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कटाक्षाने लक्ष देऊन लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या इंद्रायणीच्या स्वच्छतेचा प्रस्ताव केंद्राकडूनही शक्य तितक्या लवकर मंजूर करून घ्यावा तसेच सांडपाण्यावर प्रक्रिया न करता नदीत सोडणाऱ्या कारखान्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

HMPV विषाणूसंदर्भात WHO ची मोठी माहिती, जाणून घ्या HMPV विषाणूसंदर्भात WHO ची मोठी माहिती, जाणून घ्या
मानवी मेटान्यूमो व्हायरसबद्दल (HMPV) जगभरात अलर्ट आहे. हा विषाणू सध्या चीनमधून भारत आणि इतर काही देशांमध्ये पसरला आहे. त्याच्या वाढत्या...
उच्च कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी ‘या’ 3 पद्धतीने लसणाचे करा सेवन
Kho Kho World Cup 2025 – टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरूच, ब्राझीलला धुळ चारत बादफेरीच्या दिशेने टाकले पाऊल
कुंभमेळ्याच्या योजनेबाबत स्टीव्ह जॉब्स यांनी लिहिलेल्या पत्राची 4.32 कोटींना विक्री
…तर मी राष्ट्रपतींपर्यंत जाईल; संतोष देशमुख हत्याप्रकरणात सुरेश धस नेमकं काय म्हणाले?
जया बच्चन हजारोंसमोर सुनेबद्दल असं काही बोलल्या,ते ऐकून ऐश्वर्याला रडू आलं, व्हिडीओ व्हायरल
कोणत्याही सुरक्षेच्या उपाययोजनेशिवाय बीडीडीतील इमारतीचे पाडकाम का केले? आदित्य ठाकरे यांचा सवाल