वाल्मीकच्या संपर्कातील अधिकाऱ्यांना वगळले, संतोष देशमुख हत्येच्या तपासासाठी नवीन एसआयटी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपासासाठी स्थापन करण्यात आलेली एसआयटी बदलण्याची नामुष्की महायुती सरकारवर आली आहे. आयपीएस अधिकारी बसवराज तेली यांच्या नेतृत्वाखालील दहा जणांच्या पथकातील काही अधिकारी हे वाल्मीक कराडच्या जवळचे असल्याचा आरोप झाला. त्यामुळे नव्याने सात जणांची एसआयटी नेमण्यात आली असून तेली हेच पथकाचे प्रमुख आहेत.
तपास पथकात किरण पाटील (अपर पोलीस अधिक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, छत्रपती संभाजीनगर), अनिल गुजर (पोलीस उप अधिक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, बीड), सुभाष मुठे (पोलीस निरीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, बीड), अक्षयकुमार ठिकणे (पोलीस निरीक्षक, भरारी पथक राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे), शर्मिला साळुंखे (पोलीस हवालदार, भरारी पथक राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे), दीपाली पवार (पोलीस हवालदार, सीसीटीएसएस राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
यांना तपासातून हटवले
विजयसिंग जोनवाल (स.पो. निरीक्षक) महेश विघ्ने (उपनिरीक्षक), आनंद शिंदे (उपनिरीक्षक, तुळशीराम जगताप (सहा. उपनिरीक्षक), मनोज वाघ (पोलीस हवालदार), चंद्रकांत काळकुटे (पोलीस नाईक), बाळासाहेब अहंकारे (पोलीस नाईक), संतोष गित्ते (पोलीस शिपाई) यांना एसआयटीमधून हटविण्यात आले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List