28 जानेवारीपर्यंत फळपीक विम्याची रक्कम जमा करा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यलयावर आंदोलन करणार; शिवसेनेचा इशारा

28 जानेवारीपर्यंत फळपीक विम्याची रक्कम जमा करा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यलयावर आंदोलन करणार; शिवसेनेचा इशारा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुनर्रचित हवामानावर आधारित आंबा, काजू फळपीक विमा योजना सन 2023-24 मध्ये 42 हजार 190 शेतकऱ्यांनी आंबा व काजू फळपीकांचा विमा उतरविला होता. त्यामध्ये शेतकऱ्यांचा 12 कोटी रुपये हप्ता विमा कंपनीकडे जमा करण्यात आला होता. मात्र त्यापैकी आंबा पिकामध्ये 3 हजार शेतकरी व काजू पिकामध्ये साधारण 900 शेतकऱ्यांना अद्यापही फळपीक विम्याची रक्कम मिळालेली नाही. ही रक्कम 28 जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्याच जमा झाली नाही, तर जिल्हाधिकारी कार्यलयावर धरेण आंदोलन करण्याचा इशारा शिवसेने दिला आहे.

दोडामार्ग तालुक्यामध्ये तळकट आणि कोनाळ, कुडाळ तालुक्यामध्ये गोठोस, ओरोस बु., मडगाव आणि सावंतवाडी तालुक्यामध्ये निरवडे या सहा सर्कलमध्ये असणाऱ्या शेतकऱ्यांची विम्याची सुमारे 12 कोटी रुपये रक्कम प्रलंबित ठेवण्यात आली आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा कृषि अधिक्षक, विमा कंपनीचे अधिकारी यांनी येणाऱ्या 28 जानेवारी 2025 पर्यंत विम्याची प्रलंबित रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची कार्यवाही करावी. अन्यथा 29 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने माजी आमदार वैभव नाईक, परशुराम उपरकर, राजन तेली, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, संजय पडते, बाबुराव धुरी यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळाले नाहीत त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन शिवसेनेने केले आहे. यासंदर्भात राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याशी देखील आम्ही पत्रव्यवहार करणार आहोत. सरकराने आणि प्रशासनाने तातडीने याची दखल घ्यावी व प्रलंबित फळपीक विम्याची रक्कम तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल त्यादृष्टीने सर्व प्रयत्न आम्ही करणार आहोत, अशी माहिती शिवसेना कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

का नाही झालं सलमान खानचं लग्न? अभिनेत्याच्या वडिलांकडून मोठा खुलासा का नाही झालं सलमान खानचं लग्न? अभिनेत्याच्या वडिलांकडून मोठा खुलासा
Salman Khan Marriage: सलमान खानचं रिलेशनशिप स्टेटस बॉलिवूडपासून सोशल मीडियापर्यंत चर्चेचा असतो आणि आजही तो एलिजिबल बॅचलर मानला जातो. सलमान...
सुब्रमण्यनवर संतापून ‘मेंटल हेल्थ मॅटर्स’ म्हटलेली दीपिकाही अनुभवला असा काही अनुभव
विवाहित कुमार सानू यांच्यासोबत पत्नीसारखी राहायची ही प्रसिद्ध अभिनेत्री; 5 वर्षे केलं डेट
सचिन तेंडुलकरची लेक की सौरव गांगुलीची लेक, कोण आहे उच्च शिक्षित?
बॉलिवूडची ‘ती’ अभिनेत्रीने जिने लग्नाआधी क्रिकेटरच्या मुलीला दिला जन्म, मात्र त्याने सोडली साथ
दिग्दर्शकाने कट बोलल्यावरही किस करत राहिला; ‘त्या’ व्हिडीओमुळे वरूण धवन चांगलाच ट्रोल
‘आताच उमराह केला अन् आता मंदिरात..’; सिद्धिविनायक मंदिरात गेल्याने हिना खान ट्रोल