Baba Siddique Case : हत्येमागे बिल्डर लॉबी? झिशान सिद्दीकींचा खळबळजनक आरोप, पोलीस लपवताय काय?

Baba Siddique Case : हत्येमागे बिल्डर लॉबी? झिशान सिद्दीकींचा खळबळजनक आरोप, पोलीस लपवताय काय?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची मुंबईत कार्यालयाबाहेर हत्या झाली होती. या खूनप्रकरणात मुंबई पोलिसांनी गँगस्टर लाँरेन्स बिश्नोई याला क्लीनचिट दिली. तर त्याचा लहान भाऊ अनमोल हा यातील मास्टरमाईंड असल्याचा दावा केला. पण या संपूर्ण तपासावर त्यांचा मुलगा आणि माजी आमदार झिशान सिद्दीकी यांनी गंभीर आरोप केले आहेत. मुंबई पोलीस काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. या हत्येमागे बिल्डर लॉबी असल्याचा दावा त्यांनी केला. एसआरए विकास प्रकल्पातून ही हत्या झाल्याचा दावा होत असताना त्यादृष्टीने तपास का करण्यात आला नाही. ज्यांच्यावर संशय व्यक्त केला. त्यांची पोलिसांनी चौकशी का केली नाही. जे संशयित आहेत, त्यातील काही बांधकाम व्यावसायिक आहेत, असा आरोप झिशान यांनी केला. त्यामुळे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

झिशान सिद्दीकी तपासावर नाराज

झिशान सिद्दीकी पोलिसांच्या तपासावर नाराज आहेत. मुंबई पोलीस खूनाचा आरोप अनमोल बिश्नोई याच्यावर टाकून मोकळे होत असल्याचा आरोप त्यांनी केला. ज्या बांधकाम व्यावसायिकांवर आपण संशय घेतला, त्यांना साधं चौकशीला सुद्धा बोलावण्यात आलं नसल्याचा आरोप झिशान यांनी केला. पोलिसांनी अनमोल बिश्नोई हा या हत्याकांडातील मास्टरमाईंड असल्याचा दावा केला आहे. शुभम लोणकर आणि झिशान यांनी हत्या घडवून आणले असे सांगितले. दोषारोपपत्रात एकूण 29 आरोपी आहेत. मास्टरमाईंड आणि इतर आरोपी अजून अटकेत नाहीत. मग त्यांची अटक नसताना पोलिसांनी ही थेअरी कशी मांडली? असा सवाल ही त्यांनी केला.

तीन आरोपी अद्याप फरार

12 ऑक्टोबर 2024 रोजी बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली होती. झिशान यांच्या कार्यालयाबाहेर गोळीबार झाला. त्यात सिद्दीकी यांना गोळी लागली. यातील दोन शूटरला घटनास्थळीच पकडण्यात आले. तर तिसरा पळाला. अकोल्यातील शुभम लोणकर याने हत्या केल्याची पोस्ट समाज माध्यमावर टाकली होती. त्याने शूटर्सला शस्त्र पुरवली होती.

पोलिसांनी प्रकरणात 4590 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले. त्यात या हत्येसाठी एकूण 29 जणांना दोषी ठरवले आहेत. त्यातील 26 जणांना अटक केली आहे. तर मोहम्मद यासीन अख्तर उर्फ सिंकदर, शुभम लोणकर आणि अनमोल बिश्नोई हे फरार आहेत. याप्रकरणात पोलिसांनी 180 साक्षीदार तपासले आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आमिर खानचा लेक अन् श्रीदेवीची धाकटी मुलगी एकत्र; विषय आहे प्रेम, लग्न अन्… आमिर खानचा लेक अन् श्रीदेवीची धाकटी मुलगी एकत्र; विषय आहे प्रेम, लग्न अन्…
बॉलिवूड सेलिब्रिटींप्रमाणेच आता त्यांच्या मुला-मुलींचे म्हणजेच ज्यांना स्टारकिडस् म्हटलं जातं त्यांचेही बॉलिवूडमध्ये पदार्पण होताना दिसत आहे. बरेच स्टारकिड्स तसे बॉलिवूडमध्ये...
‘ही’ बॉलिवूड अभिनेत्री करतेय प्रसिद्ध सितार वादक ऋषभ शर्माला डेट? फोटो व्हायरल
HMPV आणि COVID-19 दोन्ही आजार सारखेच आहेत की वेगळे? जाणून घ्या
संभाजीनगरमध्ये शिवसेनेचा भव्य मेळावा पडला पार
Leopard Attack- दापोलीत मध्यरात्रीत भर वस्तीत घुसून बिबट्याचा धुमाकूळ, 6 बकऱ्यांचा पाडला फडशा
आसाम खाण दुर्घटनेतील 4 कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश; अजूनही बचाव कार्य सुरूच
बुलढाण्यात केस गळतीनंतर आता ब्ल्यू बेबी सिंड्रोमचे संकट