Short news – कल्याणमध्ये मद्यधुंद कार चालकाची दहा दुचाकींना धडक
कल्याण पश्चिम येथे एका मद्यधुंद कारचालकाने भरधाव गाडी चालवत दहा दुचाकाRना धडक दिल्याची घटना रात्री उशिरा घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु अनेक दुचाकाRना मोठे नुकसान झाले आहे. बाजारपेठ पोलिसांनी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या अनिल तिवारी या कारचालकाला ताब्यात घेतले आहे. कल्याण पश्चिम येथील चिराग हॉटेल समोरील रस्त्यावर हा प्रकार घडला.
‘यांत्रिकांच्या सावल्या’ पुस्तकाचे आज प्रकाशन
सदामंगल पब्लिकेशन या संस्थेतर्फे शनिवारी सायंकाळी 6 ते 8 या वेळेत भूपेश गुप्ता भवन, प्रभादेवी येथे प्रज्ञा जांभेकर लिखित ‘यांत्रिकाच्या सावल्या’ या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. ‘यांत्रिकाच्या सावल्या’ या पुस्तकात किर्लोस्कर उद्योग समूहाचे पहिले महाव्यवस्थापक आणि एक संस्थापक शंभोराव जांभेकर आणि त्यांच्या पत्नी गंगाबाई, त्यांचे चिरंजीव आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड रामकृष्ण जांभेकर आणि त्यांच्या पत्नी कॉम्रेड सुहासिनी जांभेकर यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला आहे. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा ज्येष्ठ पत्रकार, माजी खासदार कुमार केतकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून ज्येष्ठ पत्रकार, लेखक विनय हर्डीकर आणि सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या वेळी प्रज्ञा जांभेकर यांच्या ‘ऑपरेशन एक्स’ या पुस्तकाच्या सुधारित तिसऱया आवृत्तीचे प्रकाशनही होईल.
शस्त्रक्रियेसाठी छोटा राजन एम्समध्ये दाखल
अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला नाकावर शस्त्रक्रिया करण्यासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार त्याला नाकाच्या किरकोळ ऑपरेशनसाठी गुरुवारी एम्समध्ये नेण्यात आले. ऑपरेशननंतर त्याला पुन्हा तिहार तुरुंगात आणले जाईल, असे तुरुंगातील अधिकाऱयाने सांगितले.
पाकिस्तानमध्ये आदिवासी परिषदेत राडा
पाकिस्तानमधील एका गावात आज दोन प्रतिस्पर्धी गटांमध्ये सामंजस्य घडवून आणण्यासाठी बोलावण्यात आलेल्या जिरगादरम्यान (आदिवासी परिषद) गोळीबाराची घटना घडली. या घटनेत किमान 4 जण ठार झाले असून अनेक जण जखमी झाले. खैबर पख्तुनख्वा प्रांतातील लक्की मारवत जिह्यात ही घटना घडली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List