भाजपच्या बड्या नेत्याकडून सुरेश धस यांची पाठराखण? धनंजन मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मोठं वक्तव्य

भाजपच्या बड्या नेत्याकडून सुरेश धस यांची पाठराखण? धनंजन मुंडेंच्या राजीनाम्याबाबत मोठं वक्तव्य

काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता वातावरण चांगलंच तापलं आहे. आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी रेणापूरमध्ये आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. ‘जोपर्यंत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल लागत नाही, तोपर्यंत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी राजीनामा द्यावा’ अशी मागणी आंदोलकांनी केली, यावर आता भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते अहिल्यानगर दौऱ्यावर असताना बोलत होते.

नेमकं काय म्हणाले प्रवीण दरेकर? 

संतोष देशमुख यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी रेणापूरमध्ये आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चामध्ये धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. यावर प्रतिक्रिया देताना दरेकर यांनी म्हटलं की, या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे, कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही.  जे आरोपी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. त्यामध्ये कोणाचीही गय केली जाणार नाही, असं दरेकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी सुरेश धस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. धस यांनी मुंडेंविरोधात सुपारी घेतली असं त्यांनी म्हटलं होतं. मिटकरी यांच्या या वक्तव्यावर देखील दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

घटनेकडे राजकीय अभिवेषातून न पाहाता सुरेश धस यांनी घेतलेली ही भूमिक आहे. कुठलाही गुन्हा हा गुन्हा असतो त्यामुळे त्यात पक्षीय राजकारण येत नाही. कोणी सुपारी घेतली नाही, किंवा कुणी कोणाला टारगेट केलं नाही असं दरेकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता दरेकर यांनी एक प्रकारे सुरेश धस यांची पाठराखणच केली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या घटनेवरून सर्व राज्यातील सरपंच खतरे में है असं अनुमान लावणं चुकीचं आहे. या पुढे अशा घटना होणार नाहीत,   जे जे आरोपी असतील त्यांना ठेचून काढण्याची भुमिका राज्याचे मुख्यमंत्री घेत आहेत, असंही यावेळी दरेकर यांनी म्हटलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

लाडक्या बहिणीसाठी योजना आणणाऱ्या राज्यांमध्ये महिलांच्या मतदानात 5 पट वाढ, एसबीआयच्या अहवालातून माहिती समोर लाडक्या बहिणीसाठी योजना आणणाऱ्या राज्यांमध्ये महिलांच्या मतदानात 5 पट वाढ, एसबीआयच्या अहवालातून माहिती समोर
दिल्लीत विधानसभा निवडणुकीच्या तारखेची घोषणा झाली आहे. येथे 5 फेब्रुवारी रोजी मतदान आणि 8 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार. निवडणुकीची तारीख...
येत्या रविवारी मेगा ब्लॉकची वेळ काय? घरातून बाहेर पडण्याआधी जाणून घ्या A टू Z माहिती
‘त्या वृद्धाने मला घाणेरडा स्पर्श केला’; बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितला तो भयानक किस्सा
‘एशियन कल्चर’ पुरस्काराने लेखक आणि गीतकार जावेद अख्तर सन्मानित
मुंबई महानगरपालिकेवर डोमकावळ्यांचं लक्ष, शिवसेना BMC निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार आणि जिंकणार – विनायक राऊत
Photo – हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दादर येथील राष्ट्रीय स्मारकाचा पहिल्ला टप्पा पूर्ण
विधानसभा निवडणुकीत परळीत 201 बूथ ताब्यात घेऊन मतदान करण्यात आलं, जितेंद्र आव्हाड यांचा आरोप