सेंट्रल किचनमधून हजारो आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ; पोषण आहारात सडक्या भाज्या, बुरशी लागलेले धान्य, कच्च्या पोळ्या
आदिवासी विकासच्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील सेंट्रल किचनमधून 44 आश्रमशाळांमधील हजारो विद्यार्थ्यांना पोषण आहाराच्या नावाखाली सडलेल्या भाज्या, कीड-बुरशी लागलेले डाळ, तांदूळ आणि नदीच्या पाण्यापासून तयार केलेले जेवण दिले जाते. याच्या निषेधार्थ पिंप्री सदोतील एकलव्य रेसिडेन्शियल स्कूलमधील मुलांनी थंडीत कुडकुडत गुरुवारी रात्री उशिरापर्यंत आंदोलन केले. सत्ताधारी आमदार हिरामण खोसकरांनी किचनला भेट देऊन अस्वच्छता, निकृष्ट आहाराची पोलखोल केली.
दरम्यान, निकृष्ट अन्नप्रकरणी संबंधित ठेकेदाराला काळय़ा यादीत टाकून अधिकाऱयांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आज आदिवासी विकास परिषदेने आयुक्त नयना गुंडे यांच्याकडे केली. पदाधिकारी आणि पालकांनी आदिवासी आयुक्तालयात धडक दिली. तीन वर्षांपासून गणवेश खरेदी कागदावरच आहे, यासह अनेक समस्या मांडल्या.
कोटय़वधी रुपये जातात कुठे?
जेवणाच्या दर्जाबाबत तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे जिह्यातील हजारो मुले रोजचा दिवस कधी उपाशीपोटी, तर कधी निकृष्ट अन्न खाऊन शिक्षण घेत ढकलत आहेत. तासन्तास वाट पाहिल्यानंतर ताटात पडणाऱया या अन्नातून मुलांना कुठले पोषण मिळते? सरकार केवळ मुलांच्या जिवाशी खेळ खेळत आहे. या आहारासाठीचे कोटय़वधी रुपये जातात कुठे, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List