संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना मोक्का, आता मनोज जरांगे यांची मोठी मागणी काय?
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण केल्याच्या प्रकरणात राज्य सरकारने अखेर आठ आरोपींवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आता सर्व आरोपींवर विशेष न्यायालयात खटला चालविण्यात येणार असून त्यांना कठोर शिक्षेची तरतूद या मोक्का कायद्यात आहेत. त्यामुळे या प्रकरणात मोक्का लावण्यात आल्याने प्रमुख आरोपी वाल्मिक कराड याच्यावर देखील मोक्का कलम लागू होऊ शकते असे म्हटले जात आहे. या निर्णयाचे स्वागत करतानाचे मोठी मागणी मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी केली आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख याच्या निर्घृण हत्येला महिना झाला असताना या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आठ आरोपींना मोक्का लावण्यात आला आहे. या संदर्भात मराठा नेते मनोज जरांगे यांनी मोठी मागणी केली आहे. जरांगे म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी देशमुख यांच्या कुटुंबाला शब्द दिला आहे. सर्वांना मोक्का लावणा असे त्यांनी स्पष्ट केले होते. फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालणार आहे. सर्वांना फासावर लटकवणार, कुणालाही सोडणार नाही, मग आमची फक्त मुख्यमंत्र्यांकडे एकच मागणी आहे.
मुंडेंनी पसरवलेल्या गुंडगिरीच्या नेटवर्कचा नायनाट करा
जरांगे पुढे म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी राज्यात धनंजय मुंडेंनी पसरवलेल्या गुंडगिरीच्या नेटवर्कचा नायनाट करावा. हे बलात्कार करतात. दरोडे टाकतात. हे खून करतात. हे हत्येचा प्रयत्न करतात. सरकारी मलिदा खातात. कुणाच्या जमिनी, कुणाचे प्लॉट लुबाडतात. अंतरवलीतही परळीपासून ते मुंबईपर्यंतच्या तक्रारी येत आहे. फडणवीस यांनी खंडणी आणि खून करणाऱ्यांच्या या साखळीला कलम ३०२ मध्ये फडणवीस यांनी गुन्हा दाखल करावा असे जरांगे यांनी म्हटले आहे.
खंडणीच्या आरोपींना ३०२ मध्ये टाकावे
या प्रकरणातील आता जे खंडणीचे आरोपी आहेत. त्यांना ३०२ मध्ये टाकावे. मुख्यमंत्री टाकतील. मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला. म्हणूनच मराठे शांत आहेत. हे सर्व आत जाऊ द्या. राज्यातील जेवढी साकळी आहे ते ४०० ते ५०० असतील. आंदोलन करणारी ही संघटक गुन्हेगारी करणारी टोळी आहे. धनंजय मुंडेंनी ही टोळी पाठवली आहे. आंदोलन करायला. ही लाभार्थी टोळी तपासा. हे सहआरोपी होऊ शकतात आणि परभणी प्रकरणालाही न्याय द्यावा असेही जरांगे यांनी म्हटले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सुदर्शन घुले , कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे, जयराम चाटे, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनवणे,महेश केदार या आऱोपींवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List