मोठी बातमी! उल्हासनगरचं शासकीय रुग्णालय 3 तासांपासून अंधारात, ऑपरेशन्स रखडले

मोठी बातमी!  उल्हासनगरचं शासकीय रुग्णालय 3 तासांपासून अंधारात, ऑपरेशन्स रखडले

मोठी बातमी समोर येत आहे. उल्हासनगरचं शासकीय मध्यवर्ती रुग्णालय मागील तीन तासांपासून अंधारात आहे. रुग्णालयात लाईट नसल्यामुळे रुग्ण त्रस्त झाले आहेत. जनरेटर बॅकअप सुद्धा मिळू शकत नसल्यामुळे ऑपरेशन्स आणि प्रसूती देखील ठप्प झाल्या आहेत. सुदैवानं आयसीयूमध्ये बॅकअप असल्यामुळे आयसीयूमधील मशिनरी सुरू आहेत. मात्र रुग्णालयात होणारे ऑपरेशन्स आणि प्रसुती लाईट नसल्यामुळे रखडल्या आहेत.

शुक्रवारी उल्हासनगरमध्ये महावितरण कडून शटडाऊन घेतला जातो. या शटडाऊनच्या काळात रुग्णालयात जनरेटरच्या माध्यमातून वीजपुरवठा सुरू राहतो. मात्र आज शटडाऊनच्या काळात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रुग्णालयातील इलेक्ट्रिक पॅनल बदलण्याचं काम हाती घेण्यात आलं असून, त्यामुळे जनरेटर देखील बंद ठेवण्यात आले आहेत. परिणामी संपूर्ण हॉस्पिटलचा वीज पुरवठा मागील तीन तासांपासून खंडित झाला आहे.

विशेष म्हणजे  पुढील तीन ते चार तास वीज पुरवठा सुरू होणार नसल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे संपूर्ण रुग्णालयात अंधार पसरला असून वार्डातले लाईट पंखे बंद असल्यामुळे रुग्ण त्रस्त झाले आहेत. सुदैवानं आयसीयूमध्ये बॅकअप असल्यामुळे आयसीयूमधील मशिनरी सुरू आहेत. मात्र रुग्णालयात होणारे ऑपरेशन्स आणि प्रसुती लाईट नसल्यामुळे रखडल्या आहेत. एखादं इमर्जन्सी ऑपरेशन करायचं असेल, तर आम्ही रुग्णांना उल्हासनगरमधीलच दुसऱ्या शासकीय रुग्णालयात घेऊन जातो आणि तिथे ऑपरेशन करतो, अशी माहिती रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोहर बनसोडे यांनी दिली आहे.

वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे रुग्णांचे हाल

दरम्यान महावितरणकडून दर शुक्रवारी घेण्यात येत असलेल्या शटडाऊनमुळे रुग्णालयाचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. जेव्हा वीज पुरुवठा खंडित होतो तेव्हा रुग्णालयाकडून पर्यायी व्यवस्था करण्यात येते. मात्र  आज शटडाऊनच्या काळात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रुग्णालयातील इलेक्ट्रिक पॅनल बदलण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे, त्यामुळे पर्यायी व्यवस्था देखील उपलब्ध नाहीये, आणखी तीन ते चार तास वीज पुरवठा सुरू होणार नसल्याची माहिती समोर आली आहे, वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे रुग्णांचे हाल सुरू असून, ऑपरेशन्स रखडल्याचं समोर आलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

चंद्रपूर जिल्ह्यातील घनदाट वन क्षेत्र घटले, नव्या सर्वेक्षणात धक्कादायक वास्तव आले समोर चंद्रपूर जिल्ह्यातील घनदाट वन क्षेत्र घटले, नव्या सर्वेक्षणात धक्कादायक वास्तव आले समोर
वन विभागाने अलीकडेच केलेल्या सर्वेक्षणात चंद्रपूर जिल्ह्यातील घनदाट वन क्षेत्र दोन टक्क्यांनी कमी झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. वन...
घरगडी ते अण्णा…! वाल्मीक कराडचा दहशत माजवणारा प्रवास
मुंबई हल्ल्याचा सूत्रधार मक्कीचा लाहोरमध्ये मृत्यू
अपहरण करून काढले तरुणाचे अश्लील व्हिडीओ, बँक खात्यातून काढले पैसे
वातावरण बदलाचा फटका, आंब्यावर तुडतुड्याचा प्रादुर्भाव; बागायतदार चिंतेत
पवनचक्कीच्या वादातून धाराशीवमध्ये पुन्हा सरपंचावर हल्ला
बीडमध्ये आज सर्वपक्षीय मोर्चा, संपूर्ण शहरात अभूतपूर्व बंदोबस्त