‘ईव्हीएम’ म्हणजे ‘एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला’! नीतेश राणे यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

‘ईव्हीएम’ म्हणजे ‘एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला’! नीतेश राणे यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

सातत्याने वादग्रस्त विधाने करणारे भाजपचे मत्स्यव्यवसाय व बंदरेमंत्री नीतेश राणे यांनी आज पुन्हा सांगलीत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ‘सेक्युलर’ हा शब्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानात नाही; ही घाण काँग्रेसने केली आहे,’ असा जावईशोध लावत विरोधक ‘ईव्हीएम’च्या नावाने गळे काढत आहेत. कारण त्यांना हिंदू एकत्र येऊ शकतो, हे बघवत नाही. ‘ईव्हीएम’ म्हणजे ‘एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला’!’ असे विधान राणे यांनी केले. त्यांच्या या विधानाचे तीव्र पडसाद उमटत आहेत.

दरम्यान, मिरजचे आमदार सुरेश खाडे यांनी ‘आपण मिनी पाकिस्तानमधून चार वेळा निवडून आलो आहोत,’ असा फूत्कार सोडून तमाम मिरजकर मतदारांचा अवमान केल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. सांगलीत ‘हिंदू गर्जना सभे’चे आयोजन केले होते. यावेळी राणे म्हणाले, ‘मी मतासाठी कधीच त्यांच्या मोहल्ल्यात गेलो नाही. मुंबईतून मला पाडण्याची फिल्डिंग लावली होती; पण मी हिंदू मतांवरच आमदार झालो आहे. विरोधक ‘ईव्हीएम’च्या नावाने गळे काढत आहेत. कारण त्यांना हिंदू एकत्र येऊ शकतो हे बघवत नाही. ‘ईव्हीएम’ म्हणजे ‘एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला’ हा त्याचा लॉँगफॉर्म आहे, तो हिंदूंनी लक्षात ठेवावा,’ असे वादग्रस्त विधान नीतेश राणे यांनी केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

महाराणी येसूबाई यांची समाधी राज्य संरक्षित स्मारक घोषित महाराणी येसूबाई यांची समाधी राज्य संरक्षित स्मारक घोषित
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्नुषा, धर्मवीर संभाजीराजे यांच्या पत्नी व स्वराज्याच्या कुलमुखत्यार महाराणी येसूबाई यांची माहुली येथील समाधी राज्य सरकारने...
Short news – कल्याणमध्ये मद्यधुंद कार चालकाची दहा दुचाकींना धडक
नवरा साडी नेसतोय, लिपस्टिकही लावतोय; घटस्फोटासाठी बायको पोहोचली कोर्टात
दिल्लीतील बारावीतील विद्यार्थ्याने शाळांना केले धमकीचे 23 मेल
सेंट्रल किचनमधून हजारो आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ; पोषण आहारात सडक्या भाज्या, बुरशी लागलेले धान्य, कच्च्या पोळ्या
‘हश मनी’ प्रकरणात ट्रम्प यांची जेलवारी टळली
कॅलिफोर्नियातील आगीचे रौद्ररूप, 10 ठार; 40 हजार एकर परिसरात तांडव, 29 हजार एकरवर फक्त राख