आईने केली मुलाची हत्या वांद्रे पूर्व येथील घटना 

आईने केली मुलाची हत्या वांद्रे पूर्व येथील घटना 

सिझोपहनिया आजाराने त्रस्त असलेल्या महिलेने तिच्या पोटच्या मुलाची घरात वायरने गळा आवळून हत्या केल्याची घटना वांद्रे पूर्वच्या खेरवाडी परिसरात घडली. याप्रकरणी खेरवाडी पोलिसांनी एका महिलेला अटक केली. अटक महिला ही मंत्रालयात अधिकारी असलेल्या अधिकाऱयाची पत्नी आहे. तिला अटक करून आज न्यायालयात हजर केले होते. या घटनेने खेरवाडी परिसरात एकच खळबळ उडाली होती.

मृत मुलगा हा त्याच्या आई आणि वडिलांसोबत वांद्रे खेरवाडी परिसरात राहत होता. मुलाच्या आईला सिझोपहनिया आजाराची लागण झाली आहे. तिच्यावर उपचार सुरू होते. ती कधी क्षुल्लक कारणावरून आक्रमक व्हायची तर कधी अति प्रेमळपणे वागायची. त्या आक्रमक झाल्यावर कोणाचेही ऐकत नसायच्या आणि प्रेमाने वागू लागल्यावर एखाद्यावर जीव लावत असायच्या. तिच्या विचित्र वागणुकीमुळे सुरुवातीला त्यांना काहीच कळत नव्हते. गुरुवारी सायंकाळी त्या मुलासोबत घरी होत्या.

रात्री पावणेआठच्या सुमारास त्यांनी अचानक रूमचा दरवाजा ओढून घेतला. त्यानंतर बेडरूममध्ये असलेल्या त्यांच्या लहान मुलाची वायरने गळा आवळून हत्या केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रॅली काढणाऱया गुंडांची पोलिसांनी काढली धिंड, जामिनावर सुटल्यानंतर येरवडय़ात काढली होती मिरवणूक रॅली काढणाऱया गुंडांची पोलिसांनी काढली धिंड, जामिनावर सुटल्यानंतर येरवडय़ात काढली होती मिरवणूक
‘मोक्का’च्या गुह्यात जामीन मिळाल्यानंतर येरवडय़ात मिरवणूक काढून दहशत निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी 35 ते 40 गुन्हेगारांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर टोळीप्रमुखाच्या...
शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण, उद्धव ठाकरे यांनी केली पाहणी; 23 जानेवारी 2026 ला होणार लोकार्पण
मुंबईला लुटणाऱ्या घोटाळेबाजांची नि:पक्षपाती, उघड चौकशी करा! आदित्य ठाकरे यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
‘ईव्हीएम’ म्हणजे ‘एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला’! नीतेश राणे यांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य
पप्पा, आम्हाला माफ करा, आम्ही तुम्हाला वाचवू शकलो नाही! संतोष देशमुखांची मुलगी वैभवीचा आक्रोश
टोरेस घोटाळ्यामागे युक्रेनचे माफिया; पोलीस संरक्षण मागत, आरोपी सीएची कोर्टात याचिका
लाडक्या बहिणींना पैसे देण्यासाठी देवा‘भाऊ’ दारूविक्री वाढवणार, महसूल वाढीसाठी मद्यधोरण बदलणार, पाचजणांची समिती