मुंबईला लुटणाऱ्या घोटाळेबाजांची नि:पक्षपाती, उघड चौकशी करा! आदित्य ठाकरे यांची पालिका आयुक्तांकडे मागणी

मुंबईला लुटणाऱ्या घोटाळेबाजांची नि:पक्षपाती, उघड चौकशी करा! आदित्य ठाकरे यांची पालिका आयुक्तांकडे मागणी

मिंधे-भाजप सरकारच्या सत्ताकाळात मुंबई महानगरपालिकेत झालेला सहा हजार कोटींचा रस्ते घोटाळा आणि 263 कोटींचा स्ट्रीट फर्निचर घोटाळा उघड केल्यानंतर अद्याप त्याचा चौकशी अहवाल बाहेर आलेला नाही. त्यामुळे मुंबईला लुटणाऱया घोटाळेबाजांची निःपक्षपाती आणि उघड चौकशी करा, अशी मागणी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांच्याकडे केली.

आदित्य ठाकरे यांनी आज पालिका आयुक्तांची भेट घेऊन मुंबईच्या विविध विकासकामांबाबत चर्चाही केली. मिंधे-भाजप सरकारच्या काळात सहा हजार कोटींचा घोटाळा उघड केल्यानंतर या कंत्राटाची किंमत 900 कोटींनी कमी झाली, तर स्ट्रीट फर्निचरची निविदा रद्द करण्यात आली. मात्र या घोटाळय़ांना जबाबदार असणाऱयांची चौकशी करून काय कारवाई केली याबद्दल पालिका कोणतीही माहिती द्यायला तयार नाही. त्यामुळे मुंबईची लूट करणाऱयांची चौकशी करून कारवाई करा, अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी केली. शिवाय वरळीसह मुंबईतील अनेक प्रश्नांबाबत आदित्य ठाकरे यांनी आयुक्तांशी चर्चा केली. यामध्ये वरळीमध्ये कोल्हापूर भवन, तेलुगु भवन बांधावे, रखडलेली विकासकामे पूर्ण करावीत, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

मुंबईकरांना शुद्ध, पुरेसे पाणी द्या

मुंबईच्या अनेक भागात गेल्या अनेक महिन्यांपासून दूषित आणि अपुरा पाणीपुरवठा होत आहे. याला जबाबदार कोण याबद्दल पालिकेने लोकांना उत्तर द्यावे आणि पाणीपुरवठा सुरळीत करावा, असे आवाहनही आदित्य ठाकरे यांनी केले. त्यावर मुंबईत पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न असून त्यासाठी पाण्याचे ऑडिट करून नियोजन करण्यात असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

सरकारकडून 16 हजार कोटींची थकबाकी घ्या

राज्य सरकारकडे पालिकेची विविध खात्यांची तब्बल 16 हजार कोटींची थकबाकी आहे. याचा मोठा फटका पालिकेच्या आर्थिक स्थितीला बसत आहे. त्यामुळे सरकारकडून रखडलेली देणी घ्यावीत, अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी केली. यातून आर्थिक डबघाईला आलेल्या ‘बेस्ट’ला मदत करावी, जेणेकरून ‘बेस्ट’ मुंबईकरांना चांगली सेवा देऊ शकेल, असेही ते म्हणाले.

मिंध्यांच्या दिरंगाईमुळे कोस्टल रोड रखडला

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणारा कोस्टल रोड आम्ही सरकारमध्ये असतो तर डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होऊन मुंबईकरांच्या सेवेत आला असता. मात्र मिंधे राजवटीने कोस्टल रोडच्या कामात दिरंगाई केल्यामुळे हा प्रकल्प अद्याप पूर्णत्वास गेलेला नाही. त्यामुळे शिल्लक कामे तातडीने करून प्रकल्प लवकरात लवकर खुला करावा, अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी केली.

पाण्यासह विविध प्रश्न मार्गी, वरळीकरांना दिलासा

भूषण गगराणी यांच्या भेटीदरम्यान आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील विविध समस्यांसह वरळी विधानसभेतील विविध प्रश्न मांडून त्यावर तोडगा काढला. पालिकेकडून वरळीतील बौद्ध विहार पाडण्यासंदर्भात वारंवार नोटीस दिल्या जात होत्या, मात्र बौद्ध विहारासाठी पर्यायी जागा उपलब्ध होईपर्यंत पाडकाम होणार नाही. मार्पंडेश्वरनगर येथून जाणाऱया नवीन रस्त्यामुळे वरळीतील रहिवाशांना कोणताही त्रास होणार नाही. त्यासाठी लवकरात लवकर प्रस्ताव मागवला जाणार आहे.

वरळी येथील हिंदू स्मशानभूमीच्या समस्या सोडवण्यासाठी त्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली जाणार आहे. मुंबई आणि दक्षिण प्रभागात पाण्याचा गंभीर प्रश्न असून त्यासाठी पाणी ऑडिट करून नियोजन केले जाणार आहे. सेंच्युरी मिलच्या जागेवर बांधण्यात आलेल्या म्हाडाच्या मिल कामगार वसाहतीमध्ये पाणीपुरवठ्याचा प्रश्न म्हाडा आणि पालिका यांच्यातील समन्वयाने मार्गी लावण्यात येणार आहे, असे आश्वासन पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

एसटी कुठवर आली, आता तुमच्या मोबाईलवर पाहा, नवीन वर्षात महामंडळाचं प्रवाशांना गिफ्ट एसटी कुठवर आली, आता तुमच्या मोबाईलवर पाहा, नवीन वर्षात महामंडळाचं प्रवाशांना गिफ्ट
ग्रामीण भागात एसटीही दळणवळणाचे मुख्य साधन आहे. अनेकांची सकाळ ही एसटीच्या प्रवासानेच होते. पण एसटी अनेकदा वेळ हुकवत असल्याने प्रवासी...
‘सगळं केलं, पण श्रीदेवीसोबत ‘ही’ इच्छा राहिलीच’ आमिर खानने सांगितली मनातील खंत
‘माझ्या दोन पत्नींना विचारा मी किती रोमँटिक… आमिर हे काय म्हणाला ?
Yuzvendra Chahal : घटस्फोटाच्या चर्चांमुळे चर्चेत, ‘बिग बॉस 18’मध्ये दिसणार चहल, पहिला फोटो समोर
Pune crime news – घरफोडी करणारी मध्य प्रदेशातील टोळी जेरबंद, मंचरमधील गुन्ह्याचा छडा; 13 लाखांचा ऐवज जप्त
पुण्याचा कारभारी ठरविण्यावरुन भाजपमध्ये स्पर्धा; आठवड्यात भाजपने पालिकेत दोनवेळा घेतल्या आढावा बैठका
लग्नानंतर महिन्यातच पतीचा मृत्यू; पत्नीची आत्महत्या, सांगोल्यामधील वाढेगावातील घटना