‘चाची 420’, ‘दंगल’मध्ये काम करणारी अभिनेत्री 3 वर्ष होती बेरोजगार, अन् आता करतेय ‘हे’ काम

‘चाची 420’, ‘दंगल’मध्ये काम करणारी अभिनेत्री 3 वर्ष होती बेरोजगार, अन् आता करतेय ‘हे’ काम

फातिमा सना शेख बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आपल्या करिअरमध्ये अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले. मात्र सर्वात लोकप्रिय चित्रपट म्हणजे दंगल त्यामध्ये अमीर खान मुख्य भूमिकेत होता. आमिर खानची मुलगी आणि कुस्तीपटू गीता फोगट ची भूमिका तिने साकारली होती. या चित्रपटानंतर फातिमाचे नाव सर्वांच्या ओठावर आले. पण एक वेळ अशी देखील आली की तिच्याकडे कुठलेही काम नव्हते. आज 11 जानेवारीला फातिमाचा वाढदिवस असतो. ती आज तिचा 33 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने आज तिच्या व्यावसायिक जीवनावर एक नजर टाकू. दंगल चित्रपट आल्याच्या नंतर लोक तिला ओळखू लागले पण दंगल चित्रपटाच्या आधी तिने करिअरला सुरुवात केली होती. 1997 मध्ये आलेल्या चाची 420 या चित्रपटांमध्ये तिने बालकलाकार म्हणून चित्रपटात काम केले होते. या चित्रपटांमध्ये कमल हसन मुख्य भूमिकेत होते.

तीन वर्ष नव्हते काम

2008 मध्ये प्रदर्शित झालेला तहान हा चित्रपट तिचा अभिनेत्री म्हणून पहिला चित्रपट होता. या नंतर अनेक चित्रपट आणि टीव्ही शो मध्ये फातिमा दिसली आणि 2016 मध्ये दंगल चित्रपटाचा भाग बनली. करण जोहरच्या कॉफी विथ करण या शोमध्ये तिने सांगितले होते की या चित्रपटात भूमिका मिळण्यापूर्वी तिच्याकडे तीन वर्षे कोणतेच काम नव्हते. तसेच दुसऱ्या एका मुलाखती देखील तिने सांगितले आहे की गीताची भूमिका साकारण्यासाठी तिला सहा ऑडिशन द्यावा लागल्या होत्या. सर्व ऑडिशन पास केल्यानंतर तिला या चित्रपटांमध्ये काम मिळाले होते.

दंगल चित्रपटासाठी घेतले होते प्रशिक्षण

कुस्ती बद्दल जाणून घेण्यासाठी तिने अनेक कुस्तीचे व्हिडिओ पाहिले होते. कुस्तीपटूंची देहबोली आणि चाल समजून घेण्यासाठी तिने अनेक प्रयत्न केले असल्याचे देखील तिने सांगितले आहे. या चित्रपटादरम्यान तिने फिटनेस प्रशिक्षक आणि कुस्तीपटू कृपा शंकर पटेल यांच्याकडून प्रशिक्षणही घेतले होते. दंगल या चित्रपटाला लोकांचा एवढा मोठा प्रतिसाद मिळाला होता की तो देशातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. या चित्रपटाने जगभरात 2017 कोटी रुपये कमाई केली होती.

फातिमा सना शेखने दंगल या चित्रपटांसोबतच आमिर खानच्या ‘ठग्स ऑफ हिन्दुस्तान’ या चित्रपटात देखील काम केले आहे. 2018 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि कतरीना कैफ देखील दिसले होते. हा चित्रपट लोकांच्या पसंतीस उतरला नाही आणि तो चित्रपट फ्लॉप झाला होता.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना मोक्का, आता मनोज जरांगे यांची मोठी मागणी काय? संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना मोक्का, आता मनोज जरांगे यांची मोठी मागणी काय?
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण केल्याच्या प्रकरणात राज्य सरकारने अखेर आठ आरोपींवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या...
मुंबईकरांनो सावधान! हवेची गुणवत्ता खालवल्याने श्वसनाच्या आजारात वाढ; HMVP ची स्थिती काय?
कोटींचे घर, साड्यांचा ब्रँड अन् स्वत:चं युट्युब चॅनेल; अशोक सराफांच्या पत्नी निवेदिता सराफ यांची एकूण संपत्ती किती?
‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटादरम्यान जखमी झाली होती ऐश्वर्या, पण तरीही केलेले शूटींग…नेमकं काय घडलेलं? वाचा किस्सा
अभिनेते टिकू तलसानिया यांना हृदयविकाराचा झटका, केलं रुग्णालयात दाखल; प्रकृती कशी?
‘चाची 420’, ‘दंगल’मध्ये काम करणारी अभिनेत्री 3 वर्ष होती बेरोजगार, अन् आता करतेय ‘हे’ काम
अभिनेते टीकू तलसानिया यांना हृदयविकाराचा झटका, प्रकृती गंभीर