‘राजकारणात कलाकारांना…’, माझा सुरेश धस यांना एकच प्रश्न? प्राजक्ता माळी थेट भिडल्या
Prajakta Mali Press Conference: बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण आता वेगळे वळण घेऊ लागले आहे. आमदार सुरेश धस यांनी मराठी चित्रपट कलाकार प्राजक्ता माळी यांच्याबाबत वक्तव्य केले होते. त्याला उत्तर देण्यासाठी प्राजक्ता माळी यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर या प्रकरणामुळे निर्माण झालेला ताण होता. माध्यमांमध्ये सुरु असलेल्या खोट्या बातम्यांमुळे निर्माण झालेले भय होते. त्यांनी आता मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. आमदार सुरेश धस यांच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. सोबत कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
काय म्हणाल्या प्रजक्ता माळी
आमदार सुरेस धस यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध मी करतो. सुरेश धस यांनी सांगितलेली गोष्ट खोटी आहे. एक व्यक्ती रागाच्या भरात काहीतरी बडबड करतो. त्यावर माध्यमे हजारो व्हिडिओ करतात. महिलांची अब्रू निघते सर्वांचे मनोरंजन होते. गेल्या दीड महिन्यांपासून हा प्रकार चालत आहे. परंतु मी दुर्लक्ष करत राहिले. शांत बसणे हा पर्याय स्वीकारला. आता माझा सुरेश धस यांना एक बेसिक प्रश्न आहे. तुम्ही राजकारणी आहेत. आम्ही कलाकार आहोत. तुम्ही दुसऱ्या राजकारण्यावर टीका करता. तुमचे जे काही चालले आहे ते तुम्हाला लखलाभ. परंतु या सर्व प्रकरणात तुम्ही कलाकारांना का खेचता.?
बीड प्रकरणाबाबत बोलताना प्रजक्ता माळी म्हणाल्या, या प्रकरणात आम्हा कलाकारांचा संबंध काय आहे. आमदार सुरेश धस इव्हेंट मॅनेजमेंट कसा करावा वगैरे ते बोलले. मग असे बोलताना केवळ महिला कलाकारांचीच नावे का घेतात. परळीमधील कार्यक्रमांना कधीच पुरुष कलाकार गेला नाही का? मग त्यांची नावे का येत नाही? महिला कलाकार छोट्या कुटुंबातून येऊन संघर्ष करतात. पुढे येतात आणि तुम्ही असे बोलून त्यांचे नाव बदनाम करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.
स्वार्थांसाठी कलाकारांची नावे का घेता?
प्राजक्ता माळी यांनी सुरेश धस यांच्या वक्तव्याच्या निमित्ताने समस्त कालाकारांच्या भावना मांडल्या. त्या म्हणाल्या, तुमच्या वैयक्तिक राजकारणासाठी फिल्म क्षेत्रातील महिलांच्या नावाचा गैरवापर करणे बंद करावे. त्यांनी कुत्सितपणे टिप्पणी केली. हे वागणे महाराष्ट्रातील राजकारण्यांना शोभत नाही. ही निंदणीय बाब आहे, असे प्राजक्ता माळी यांनी म्हटले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List