लाडक्या बहिणीसाठी योजना आणणाऱ्या राज्यांमध्ये महिलांच्या मतदानात 5 पट वाढ, एसबीआयच्या अहवालातून माहिती समोर

लाडक्या बहिणीसाठी योजना आणणाऱ्या राज्यांमध्ये महिलांच्या मतदानात 5 पट वाढ, एसबीआयच्या अहवालातून माहिती समोर

दिल्लीत विधानसभा निवडणुकीच्या तारखेची घोषणा झाली आहे. येथे 5 फेब्रुवारी रोजी मतदान आणि 8 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार. निवडणुकीची तारीख जाहीर होताच सगळ्याच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात करत घोषणांचा पाऊस केला आहे. यातच सत्ताधारी आम आदमी पक्षाने महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याची घोष केली आहे. यातच लोकसभा आणि महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर भाजप दिल्लीतही लाडकी बहनासारखी योजना आणण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, एसबीआयने निवडणूक आयोगाच्या डेटावर केलेल्या संशोधनात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या 19 राज्यांमध्ये लाडक्या बहिणीसाठी योजना जाहीर करण्यात आल्या आहेत, तिथे महिलांच्या मतदानात दीड कोटींनी वाढ झाली आहे. तसेच ज्या राज्यांमध्ये अशा घोषणा करण्यात आल्या नाही, तेथे ही वाढ फक्त 30 लाख होती. म्हणजे महिला योजनेंतर्गत मतदान करणाऱ्या महिलांच्या संख्येत 5 पट वाढ झाली. या अहवालानुसार, गेल्या दशकात 9 कोटींहून अधिक नवीन मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, त्यापैकी 58 टक्के महिला होत्या.

मुद्रा कर्ज योजनेतून 36 लाख महिलांचे मतदान

एसबीआयच्या अहवालानुसार, महिलांसाठीच्या केंद्र सरकारची योजना मुद्रा लोन 36 लाख महिलांच्या मतदानाचे कारण ठरलं आहे. गृहनिर्माण योजनेंतर्गत घरे मिळाल्याने 20 लाख नवमतदार महिलांचे मतदार वाढलं. 21 लाख महिलांनी फक्त शौचालये बांधल्यामुळे मतदान केलं. पिण्याचे शुद्ध पाणी आणि वीज उपलब्ध झाल्यानेही महिलांचे मतदान वाढलं आहे.

लाडकी बहीन योजनेमुळे महाराष्ट्रात मतदान वाढलं

एसबीआयच्या अहवालात देण्यात आलेल्या माहितीनुसार, राज्यात लाडकी बहीण योजेनमुळे विधानसभा निवडणुकीत महिलांच्या मतदानात 52.8 लाखांची वाढ झाली आहे. तर पश्चिम बंगालमधील 2021 च्या विधानसभा निवडणुकीत लक्ष्मी भंडार योजनेमुळे महिलांच्या मतदानात 29.1 लाखांची वाढ झाली. तसेच मध्य प्रदेशच्या 2023 च्या विधानसभा निवडणुकीत लाडली बहना योजनेमुळे महिलांच्या मतदानात 28.3 लाखांची वाढ झाली. झारखंडच्या 2024 विधानसभा निवडणुकीत मंईयां सम्मान योजनेमुळे महिलांच्या मतदानात 17.0 लाखांची वाढ झाली. तर तामिळनाडूत मगालियर उर्मिल योजनेमुळे 15.6 लाख, कर्नाटकमध्ये गृह लक्ष्मी योजनेमुळे 17.7 लाख आणि असममध्ये महिला उद्यमिता योजनेमुळे महिलांच्या मतदानात 13.0 लाखांची वाढ झाली.

याशिवाय महिलांच्या साक्षरतेत एक टक्का वाढ झाल्यामुळे त्यांच्या मतदानाचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत 25 टक्के वाढले. यामुळे 2024 मध्ये 45 लाख नवमतदार महिलांनी मतदां केलं, असंही या अहवाल सांगण्यात आलं आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आईने केली मुलाची हत्या वांद्रे पूर्व येथील घटना  आईने केली मुलाची हत्या वांद्रे पूर्व येथील घटना 
सिझोपहनिया आजाराने त्रस्त असलेल्या महिलेने तिच्या पोटच्या मुलाची घरात वायरने गळा आवळून हत्या केल्याची घटना वांद्रे पूर्वच्या खेरवाडी परिसरात घडली....
हायकोर्टात पुन्हा धनगर आरक्षणाचा मुद्दा
महत्त्वाचे – मालवण पुतळा दुर्घटना; आपटेला जामीन मंजूर
लाडक्या बहिणीसाठी योजना आणणाऱ्या राज्यांमध्ये महिलांच्या मतदानात 5 पट वाढ, एसबीआयच्या अहवालातून माहिती समोर
येत्या रविवारी मेगा ब्लॉकची वेळ काय? घरातून बाहेर पडण्याआधी जाणून घ्या A टू Z माहिती
‘त्या वृद्धाने मला घाणेरडा स्पर्श केला’; बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितला तो भयानक किस्सा
‘एशियन कल्चर’ पुरस्काराने लेखक आणि गीतकार जावेद अख्तर सन्मानित