हॉर्न वाजवल्याने तरुण भडकला, गाडीच्या टपावर चढून चालकाला मारहाण
मोठ्याने हॉर्न का वाजवला यामुळे एका तरुणाने हुज्जत घालत एका चारचाकी वाहनावर चढून चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना आज सकाळी साडेअकरा वाजता नांदेड शहरात आयटीआय चौकात घडली. वाहन चालकाने त्याच्यासहीत सदर वाहन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी सदर युवकास ताब्यात घेतले.
आज सकाळी साडेअकरा वाजता लोहा तालुक्यातील माळाकोळी येथील डॉ.प्रकाश नागरगोजे हे आपल्या गावाकडे जात असताना आयटीआय चौकात पायी चालणारा एक तरुण तेथे आला. चालकाने हॉर्न वाजविल्याने त्या तरुणाला राग आला. त्यानंतर सदरचा तरुण गाडीच्या टपावर चढला आणि त्याने तु जोरजोरात हॉर्न का वाजवत आहेस, अशी विचारणा करुन नागरजोगे यांना शिवीगाळ सुरु केली. तसेच गाडीच्या टपावर जावून चालकाच्या बाजूने त्या चालकाची गच्ची धरुन त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. पंधरा ते वीस मिनिटे हा प्रकार सुरु असताना त्याठिकाणी बघ्यांची गर्दी जमा झाली. अशाही अवस्थेत संयम न ढळू देता डॉ.प्रकाश नागरगोजे यांनी त्या युवकासह तशाच अवस्थेत गाडी शिवाजीनगर पोलीस ठाण्यातआणली. शिवाजीनगर पोलिसांनी सदर युवकास ताब्यात घेतले असून, त्याचे नाव शैलेश अवधुते (24) रा.तेहरानगर असे आहे. त्याच्या डोक्यावर थोडासा परिणाम असल्याचा पोलिसांना अंदाज आला. त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली असून, त्यानंतर त्यास सोडून देण्यात आले. घडलेला हा प्रकार झाल्यानंतर काहीकाळ आयटीआय परिसरातील वाहतूक ठप्प झाली होती.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List