Sanjay Raut : ‘मी मोदींना देव मानतो’, संजय राऊतांच्या वक्तव्याने उंचावल्या अनेकांच्या भुवया, ही कोपरखळी की खरंच केली स्तुति?

Sanjay Raut : ‘मी मोदींना देव मानतो’, संजय राऊतांच्या वक्तव्याने उंचावल्या अनेकांच्या भुवया, ही कोपरखळी की खरंच केली स्तुति?

सध्या महाविकास आघाडीतील प्रवक्त्यांच्या तोफ या एकमेकांविरोधात आग ओतत आहेत. पराभवानंतर उरलासुरला दारूगोळा एकमेकांवर डागण्यात कुठलीही कसर सोडली जात नसल्याचे चित्र आहे. त्यातच आज उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी एकला चलो रे चा नारा दिल्याने वादाला तोंड फुटले आहे. तर दुसरीकडे त्यांनी ‘मी मोदींना देव मानतो’, असं वक्तव्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आज दिवसभर संजय राऊत यांच्या स्फोटक वक्तव्याचे पडसाद दिसून आल्यास नवल वाटायला नको.

राऊतांचा शालजोडीतून प्रहार

तर काल पहिल्या पॉडकास्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. त्यांनी त्यांच्या आयुष्यातील प्रसंग, घटनांचा उलगडा केला. काही इतर प्रश्नांना बगल न देता त्यावर मत मांडले. त्यावेळी त्यांनी आपण एक माणूस असून, आपल्याकडूनही चुका होतात, असे वक्तव्य आले.

त्यावर आज माध्यमांनी खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया घेतली. त्यांनी नेहमीप्रमाणे त्यांच्या खास भाषेत या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. मी मोदींना देव मानतो, त्यांना मनुष्य मानत नाही. ज्यांना यापूर्वी देव मानल्या जायचे, त्यांनी स्वतःला मनुष्य म्हटले तरी ते माझ्यासाठी देवच आहेत. विष्णू, ब्रह्मदेव हे देवच आहेत, त्यांना मनुष्य कसं म्हणता येईल, असा खोचक टोला त्यांनी लगावला. त्यांनी मोदींना उपरोधिक टोला लगावला. आता त्यांच्या या वक्तव्याने भाजप गोटातूनही विरोधी प्रतिक्रिया येणे स्वाभाविक मानल्या जात आहे.

महाविकास आघाडीत तोफांची दिशा बदलली

लोकसभा निवडणुकीत एकमेकांवर स्तुति सुमनं उधळणारे महाविकास आघाडीतील नेते सध्या बैचेन दिसत आहे. विधानसभेत अति आत्मविश्वास नडला. गाफिल राहणे भोवले हे मान्य करतानाच आता त्यांनी तोफांची दिशा बदलली आहे. त्यांनी एकमेकांविरोधात दारूगोळा वापरायला सुरूवात केली आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आरोप केल्यानंतर दोन दिवसांपासून महाविकास आघाडीतील बेबनाव समोर येत आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी पण या वादात उडी घेतली आहे. तर संजय राऊत यांनी पण काँग्रेसचा पंचनामा केल्याचे समोर येत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना मोक्का, आता मनोज जरांगे यांची मोठी मागणी काय? संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना मोक्का, आता मनोज जरांगे यांची मोठी मागणी काय?
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण केल्याच्या प्रकरणात राज्य सरकारने अखेर आठ आरोपींवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या...
मुंबईकरांनो सावधान! हवेची गुणवत्ता खालवल्याने श्वसनाच्या आजारात वाढ; HMVP ची स्थिती काय?
कोटींचे घर, साड्यांचा ब्रँड अन् स्वत:चं युट्युब चॅनेल; अशोक सराफांच्या पत्नी निवेदिता सराफ यांची एकूण संपत्ती किती?
‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटादरम्यान जखमी झाली होती ऐश्वर्या, पण तरीही केलेले शूटींग…नेमकं काय घडलेलं? वाचा किस्सा
अभिनेते टिकू तलसानिया यांना हृदयविकाराचा झटका, केलं रुग्णालयात दाखल; प्रकृती कशी?
‘चाची 420’, ‘दंगल’मध्ये काम करणारी अभिनेत्री 3 वर्ष होती बेरोजगार, अन् आता करतेय ‘हे’ काम
अभिनेते टीकू तलसानिया यांना हृदयविकाराचा झटका, प्रकृती गंभीर