मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार अब्दुल रहमान मक्कीचा पाकिस्तानात मृत्यू
मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या सूत्रधारांपैकी एक हाफिज अब्दुल रहमान मक्की याचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. मक्की हा मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदचा नातेवाईक होता आणि बंदी घातलेल्या जमात-उद-दावाचा उपप्रमुखही होता. शुक्रवारी लाहोरमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्याचं निधन झालं. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, हाफिज अब्दुल रहमान मक्की यांचे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. मक्की हा लष्करचा वाँटेड दहशतवादी होता. तो लष्कराचा म्होरक्या हाफिज सईदचा मेहुणाही होता. मिळालेल्या माहितीनुसार, मक्की हा गेल्या काही दिवसांपासून आजारी होता आणि त्यांच्यावर लाहोरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. यातच त्याचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.
मक्कीला मे 2019 मध्ये पाकिस्तानमध्ये अटक करण्यात आली होती. यानंतर त्यांना लाहोरमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले होते. 2020 मध्ये एका पाकिस्तानी न्यायालयाने त्याला दहशतवादी वित्तपुरवठ्याशी संबंधित प्रकरणांमध्ये दोषी ठरवले आणि त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यानंतर त्याची फारशी चर्चा झाली नाही. जानेवारी 2023 मध्ये मक्कीला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (UNSC) जागतिक दहशतवादी घोषित केले होते. या अंतर्गत त्यांची संपत्ती जप्त करण्यात आली, प्रवासावर बंदी घालण्यात आली आणि शस्त्रास्त्रांवर निर्बंध लादण्यात आले.
मक्कीने 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यासाठी दहशतवाद्यांना निधी उपलब्ध करून दिला होता. या हल्ल्यात 166 जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याविरोधात मुंबई पोलीस आणि हिंदुस्थानी सैन्याने केलेल्या कारवाईत एकूण नऊ दहशतवादीही ठार झाले होते. यावेळी दहशतवादी आमिर अजमल कसाबला जिवंत पकडण्यात आले होते. मुंबई दहशतवादी हल्ल्याव्यतिरिक्त मक्की लाल किल्ल्यावरील हल्ल्यातील सहभागामुळे हिंदुस्थानी सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर होता. लाल किल्ल्यावर 22 डिसेंबर 2000 रोजी हल्ला झाला होता. या हल्ल्यात मक्कीचाही हात होता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List