Jalna Crime – हाललास तर ठार मारीन… होणाऱ्या नवऱ्याला धमकावत नराधमाने तरुणीवर केला बलात्कार

Jalna Crime – हाललास तर ठार मारीन… होणाऱ्या नवऱ्याला धमकावत नराधमाने तरुणीवर केला बलात्कार

बलात्काराच्या घटनांनी महाराष्ट्र हादरून गेला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भयंकर घटना महाराष्ट्रात घडल्या आहेत. कल्याणनतंर आता जालन्यामध्ये बलात्काराची भयंकर घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे होणाऱ्या नवऱ्यासमोरच नराधमाने जीवे मारण्याची धमकी देत पीडितेवर अत्याचार केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 25 डिसेंबर रोजी पीडित तरूणी होणारा नवरा मंगेशला (बदलेले नाव) भेटण्यासाठी रात्री आठच्या सुमारास जालन्यातील नूतन वसाहात येथे जेवणाचा डब्बा घेऊन गेली होती. जेवण झाल्यानतंर पीडिता आणि मंगेश दोघेही रेल्वेच्या भुयारी पुलाखालून घरी निघाले होते. याचवेळी पीडितेच्या ओळखीच्या प्रेम रवी पाचगे या नराधमाने त्यांची वाट आडवली. मला तुझ्याशी बोलायचे आहे, बाजूला चल असे म्हणत त्याने तरुणीवर जबरदस्ती करत तिला भुयारी पुलाच्या बाजूला असलेल्या नाल्याकडे घेऊन गेला. तसेच जागेवरून हाललास तर ठार मारीन अशी धमकी त्याने मंगेशला दिली व पीडितेवर अत्याचार केला. त्यानंतर दोघांनीही कशीबशी त्याच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली व जालना पोलीस ठाण्यात धाव घेतली.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सिध्दार्थ माने यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक अमित म्हस्के, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानदेव नागरे, पोलीस उपनिरीक्षक किशोर वनवे, पोलीस हवालदार नंदकिशोर ठाकूर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता त्यांनी तातडीने सूत्रे हालवली आणि रात्रीच आरोपी प्रेम पाचगे याचा शोध घेऊन, त्याला अटक केले आहे. याप्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या 64, 351 (2) (3) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर वनवे करीत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुलाचा रंग गोरा तर मुलगी सावळी..; वर्णभेदावर ट्विंकल खन्नाचं सडेतोड उत्तर मुलाचा रंग गोरा तर मुलगी सावळी..; वर्णभेदावर ट्विंकल खन्नाचं सडेतोड उत्तर
1990 च्या दशकात ट्विंकल खन्ना ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होती. लग्नानंतर तिने चित्रपटांमध्ये फारसं काम केलं नाही. ती लिखाणाकडे...
सलमानच्या बर्थडे पार्टीत कथित गर्लफ्रेंडने वेधलं सर्वांचं लक्ष; पहा फोटो
आणखी काही बोलायची गरज आहे का? सोनाक्षीच्या वादावरून शत्रुघ्न सिन्हा यांनी सोडलं मौन
पुणे विभागातील 29 रक्तपेढ्यांचे परवाने निलंबित, एफडीएचा दणका; नियमांचे उल्लंघन केल्याने कारवाई
रेशनकार्डधारकांना ई-केवायसीसाठी मुदतवाढ द्या! गडहिंग्लजला शिवसेनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन
Photo Pro Kabaddi: यूपी योद्धाज प्रथमच उपांत्य फेरीत
धक्कादायक… ज्युनियर क्लार्कने मारल्या न्यायाधीशांच्या खोट्या सह्या