बेस्ट वाचवा… 29 डेपोंमध्ये काळ्या फिती लावून कर्मचाऱ्यांचे आंदोलन, ‘बेस्ट’ची संपूर्ण जबाबदारी पालिकेने घेतलीच पाहिजे! शिवसेनेने ठणकावले

बेस्ट वाचवा… 29 डेपोंमध्ये काळ्या फिती लावून कर्मचाऱ्यांचे आंदोलन, ‘बेस्ट’ची संपूर्ण जबाबदारी पालिकेने घेतलीच पाहिजे! शिवसेनेने ठणकावले

मुंबईतील 35 लाखांवर प्रवाशांची  जीवनवाहिनी असणारा ‘बेस्ट’ उपक्रम आर्थिक डबघाईला आल्यामुळे मुंबई महानगरपालिकेने केवळ आर्थिक मदत न करता उपक्रमाची संपूर्ण जबाबदारी घ्यावी, अशी मागणी करीत आज शिवसेनाप्रणीत बेस्ट कामगार सेनेने सर्व बस डेपोंमध्ये निषेध आंदोलन केले. दिवसभर शेकडो कर्मचाऱ्यांनी हातावर काळ्या फिती बांधून बेस्टची संपूर्ण जबाबदारी नाकारणाऱ्या आयुक्तांचा निषेध केला. विशेष म्हणजे बेस्टच्या शेकडो प्रवाशांनीदेखील या आंदोलनात सहभाग घेतला.

मुंबईतील सर्वसामान्य-गोरगरीबांच्या प्रवासाचा सर्वाधिक पसंतीच्या बेस्ट उपक्रमाची आर्थिक स्थिती गेल्या काही वर्षांपासून प्रचंड खालावली आहे. त्यामुळे पालिकेने बेस्टला भरघोस मदत करून संपूर्ण उपक्रमाची जबाबदारीच घ्यावी, अशी मागणी आज बेस्ट कामगार सेनेकडून करण्यात आली. याबाबत पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांनी केवळ मदतीचे आश्वासन देत संपूर्ण जबाबदारी घेण्यास नकार दिला. यामुळे बेस्ट कामगार सेनेकडून हे आंदोलन पुकारण्यात आले. खऱ्या अर्थाने मुंबईचा ऐतिहासिक वारसा असलेल्या बेस्टच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळेच हे आंदोलन करण्यात येणार आल्याचे बेस्ट कामगार सेनेकडून सामंत यांनी स्पष्ट केले.

कायद्याने बेस्टची जबाबदारी पालिकेचीच!

मुंबई महानगरपालिका कायदा 1888 मधील तरतुदीनुसार पाणी, शिक्षण, स्वच्छता, आरोग्याप्रमाणे सार्वजनिक वाहतूक अशा मूलभूत सुविधांची जबाबदारी पालिकेने घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे बेस्ट तोटय़ात असल्यास पालिकेने आवश्यक ती सर्व प्रकारची मदत करणेही अपेक्षित आहे. शिवाय महापालिकाही बेस्टला आपला उपक्रम म्हणत आली आहे. त्यामुळे कायद्यानेही बेस्टची जबाबदारी पालिकेचीच असल्याचे सामंत यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रेणापूरमध्ये धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया समोर रेणापूरमध्ये धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया समोर
काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली, यावरून आता राजकारण...
राजघाटाऐवजी निघमबोध घाटावर डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर अंत्यसंस्कार, काँग्रेसचा आक्षेप
ज्युनिअर एनटीआरचा ‘देवरा’ चित्रपट जपानमध्ये प्रदर्शित होणार, तारीखही ठरली
नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई पोलीस सज्ज! 2184 पोलीस अधिकारी आणि हजारोंचा फौजफाटा तैनात
देशाच्या प्रगतीत आणि विकासात डॉ. मनमोहन सिंग यांचे अतुलनीय योगदान, सोनिया गांधी यांनी वाहिली श्रद्धांजली
घाटकोपरमध्ये भीषण अपघात, टेम्पोने 5 जणांना चिरडले; एका महिलेचा मृत्यू
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनावर चीन, रशिया आणि अमेरिकेसह अनेक देशांनी व्यक्त केला शोक