मुंबईत दिवस-रात्र थंडी, ‘थर्टी फर्स्ट’पर्यंत लाट
उत्तरेकडील बर्फवृष्टीमुळे मुंबई शहरात पुन्हा थंडीचा कडाका वाढला आहे. बुधवारी कमाल आणि किमान तापमानात मोठी घट झाल्याने दिवसा आणि रात्रीही हवेत गारवा पसरला होता. सांताक्रूझमध्ये कमाल तापमानात तीन अंशांची घट झाली, तर किमान तापमानाचा पारा 17 अंशांपर्यंत खाली घसरला. शहरात 31 डिसेंबरपर्यंत थंडीची लाट कायम राहील, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे.
गेल्या आठवडय़ात मुंबईच्या तापमानाने 13 अंशांची नीचांकी पातळी गाठली होती. त्यानंतर काही दिवस तापमान सरासरी पातळीवर राहिले. बुधवारी पुन्हा तापमानात मोठी घट झाली. अरबी समुद्रातून वारे प्रवाही राहिल्याने तसेच उत्तरेकडील बर्फवृष्टीच्या प्रभावामुळे शहरात थंडीचा कडाका वाढल्याचे हवामान तज्ञांनी स्पष्ट केले. पुढील दोन दिवस तापमान काही प्रमाणात चढे राहील. 28 डिसेंबरपासून तापमानात मोठी घसरण सुरू होईल. 31 डिसेंबरला पारा 16 अंशांच्या खाली जाईल, असे भाकीत हवामान खात्याने केले आहे.
हवेची गुणवत्ता अद्यापि ‘खराब’
मुंबईच्या हवेची गुणवत्ता अद्याप सुधारलेली नाही. बुधवारीही शहराच्या अनेक भागांत हवेचा गुणवत्ता निर्देशांक ’खराब’ श्रेणीतच होता. विषारी धुरक्याचे साम्राज्य कायम राहिल्याने अनेक नागरिकांनी स्वतःची काळजी घेत ‘मास्क’ वापरण्यास सुरुवात केली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List