17 व्या वर्षी लग्न, लग्नापूर्वीच आई, आता 47 व्या वर्षी करतेय दुसरं लग्न; कोण आहे ही बॉलिवूड अभिनेत्री
बॉलिवूड म्हटलं की अनेक रहस्य आणि गॉसिपचं भंडार असल्यासारखं आहे. यातून काहीना काही आणि सेलिब्रिटींबद्दल अशा काही गोष्टी बाहेर येतात की ज्यामुळे ज्यांना आपण पडद्यावर पाहतो त्यांच्या आयुष्यात एवढं सगळं घडत असेल असं अजिबात वाटत नाही. अशाच एका बॉलिवूड अभिनेत्रीची चर्चा सध्या सर्वत्र होताना दिसत आहे.
चित्रपटांपेक्षा खाजगी आयुष्याची चर्चा
या अभिनेत्रीने केवळ तिच्या ऑन स्क्रीन पात्रांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. तर तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही कायम चर्चेत राहिली. त्यातील एक चर्चा म्हणजे तिच्या रिलेशनशिपबद्दल. ही अभिनेत्री आहे माही गिल.
माही गिल ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. बोल्ड आणि वेगळ्या धाटणीच्या भूमिकेमुळे ती प्रसिद्ध आहे. चित्रपटांप्रमाणेच तिच्या वेब सीरिजही प्रचंड गाजल्या. देव डी या चित्रपटातून माहीला खरी ओळख मिळाली. दरम्यान माहीने सकारात्मक,निगेटीव्ह आणि बोल्ड भूमिकाही केल्या आहेत. तिची पोशिंबा ही बेव सीरिजही खूप गाजली.
17 व्या वर्षी पहिलं लग्न, लग्नाआधीच मुलगी अन् बरंच काही
दरम्यान माही तिच्या चित्रपटांपेक्षाही तिच्या खाजगी आयुष्यासंबधीची जास्त चर्चेत राहिली आहे. माहिने वयाच्या 17व्या वर्षी पहिलं लग्न केलं. एवढच नाही तर एका मुलाखती दरम्यान तिने सांगितले की, ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत राहत असून लग्नापूर्वीच तिला एक मुलगी झाली.
तिचं नाव वेरोनिका असून ती 5 वर्षांची आहे. माहीने वयाच्या 17 व्या वर्षी पहिलं लग्न केलं होतं. मात्र हे नातं फार काळ टिकलं नाही. तिने या नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
आता ती ज्या बॉयफ्रेंडसोबत राहते तो एक व्यापारी आहे. तसेच माही त्याच्यासोबत राहत असून तिने म्हटलं आहे की जेव्हा तिला वाटेल तेव्हा ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार आहे. तिचं वय आता 47 वर्ष आहे. तसेच ती आता 47 वर्षी ती दुसरं लग्न करणार असल्याचंही म्हटलं आहे.
रवि केसरसोबत लग्न गाठ बांधल्याची चर्चा
2019 मध्ये माही गिलला रवि केसरसोबत पाहिलं गेलं होतं आणि त्यावेळी दोघांच्या चर्चा संपूर्ण इंडस्ट्रीत सुरू झाल्या होत्या. दरम्यान, 2023 मध्ये माही गिलनं एका मुलाखतीत रवि केसरसोबत तिनं आपली लग्नगाठ बांधल्याचं जाहीर केलं होतं. माही गिलने 2003 मध्ये अमितोज मान दिग्दर्शित ‘हवाईन’ चित्रपटाद्वारे पदार्पण केलं. जिथे तिने बब्बू मान सोबत काम केलं.
गेल्या काही वर्षांत देव.डी, नॉट अ लव्ह स्टोरी, साहिब बीवी और गँगस्टर, पान सिंग तोमर आणि तुफान यासारख्या उल्लेखनीय चित्रपटांद्वारे तिला ओळख मिळाली.
दरम्यान माही फॅमिली ऑफ ठाकूरगंज या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. माही गिल पुढे महेश मांजरेकर यांच्या 1962: द वॉर इन द हिल्समध्ये अभय देओल, सुमीत व्यास आणि आकाश ठोसर यांच्यासोबत दिसणार आहे .
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List