स्थलांतरीतांचे प्रमाण 12 टक्क्यांनी घटले; लोक महानगर सोडून चालले उपनगरांकडे

महानगरसोडून उपनगरांकडे चालल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे हे सर्व वेगाने बदलतेय. 2011 पासून 2023 दरम्यान म्हणजेच गेल्या 12 वर्षात अशा लोकांचे प्रमाण सुमारे 12 टक्क्यांनी घटले. 75 टक्क्यांहून जास्त स्थलांतर आपल्या मूळ गावापासून 500 किलोमीटरच्या परिघापुरतेच मर्यादित झाले आहे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने 2011 ते 2023-24 दरम्यान अनारक्षित रेल्वे तिकीट, उपग्रहाद्वारे रात्रीची छायाचित्रे, मोबाईल रोमिंग नोंदणी, राज्यांतील गैरकृषी जमिनीचा वापर, बँकांतील जमा रकमेच्या आधारे स्थलांतर इत्यादी गोष्टींचे सर्वेक्षण करून एक अहवाल तयार केला.

बिहारमधून महाराष्ट्रात येणाऱ्यांची संख्या वाढली

मुंबई, बंगळुरू शहर, हावडा, सेंट्रल दिल्ली, हैदराबाद या 5 जिह्यांत सर्वाधिक स्थलांतरित येत असल्याचे दिसत आहे. बिहारमधून महाराष्ट्रात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. उत्तर प्रदेशातून दिल्ली, गुजरातमधून महाराष्ट्र, तेलंगणातून आंध्र, बिहारमधून दिल्लीत सर्वाधिक स्थलांतरीत होत असल्याचे समोर आले आहे.

महानगरांच्या शेजारी स्थलांतर वाढले

  • ठाण्याहून मुंबईला येणारे प्रवासी 2012 मध्ये 21 टक्के होते. 2023 मध्ये ते 25 टक्के झाले. जमीन वापर वर्गीकरणाच्या आकडेवारीनुसार गैरकृषी जमिनीच्या वापराचे क्षेत्र 31 टक्क्यांनी वाढले.
  • गाझियाबादमध्ये गैरकृषी जमिनीचा वापर 12 वर्षांत 18.73 टक्के वाढला. उत्तर प्रदेशात सरासरी वाढ 5.8 टक्के आहे.
  •  उत्तर परगणा आणि दक्षिण परगणा जिह्यांतून कोलकाताला जाणाऱया स्थलांतरितांच्या संख्येत वाढ झाली आहे. इतर ह्यांतून मात्र त्यात घट झाली असून 2021 मध्ये उत्तर परगणा जिह्यात केवळ 8.4 टक्के भाग गैरकृषीच्या स्वरूपात वापरला जात होता.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘मी राजीनामा मागणार नाही, दोषींना बिनभाड्याच्या खोलीत जावं लागेल’, सुरेश धस यांचं मोठं वक्तव्य ‘मी राजीनामा मागणार नाही, दोषींना बिनभाड्याच्या खोलीत जावं लागेल’, सुरेश धस यांचं मोठं वक्तव्य
भाजप नेते सुरेश धस यांनी बीड सरपंच हत्या प्रकरणावर माध्यमांना प्रतिक्रिया दिली. बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची गंभीर...
दुबईत साऊथच्या सुपरस्टारचा भयंकर अपघात, कारचे टप हवेत उडाले; व्हिडीओ पाहून हादरले फॅन्स
Pune News उसन्या पैशाच्या वादातून तरुणीची कोयत्याने वार करून हत्या
फडणवीसांसोबत नेमकी काय चर्चा झाली? मस्साजोगहून मुंबईत आलेल्या देशमुख कुटुंबियांचा खुलासा
गौरीची ‘ती’ अवस्था पाहून लग्नाच्या पहिल्याच रात्री शाहरूख खान ढसा ढसा रडला होता; असं काय घडलं होतं?
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी यशस्वी जैस्वालला मिळणार संधी? शमी-हार्दिकच्या पुनरागमनाचीही शक्यता
HMPV व्हायरसचे चीनमध्ये थैमान, वुहानमध्ये शाळा बंद; WHO ने अहवाल मागवला