आम्हाला न्याय कधी मिळणार? संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुखचा आर्त सवाल
एक महिना होऊन गेला. आम्हाला न्याय कधी मिळणार, असा सवाल संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी हिने केला, तर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय यांनी सर्व आरोपींना अटक करून त्यांना फाशी देण्याची मागणी केली आहे.
पुण्यातील सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चामध्ये संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी तसेच भाऊ आणि बहीण सहभागी झाले होते. बंधू धनंजय देशमुख म्हणाले, आम्हाला न्याय पाहिजे म्हणून आम्ही मोर्चात सहभागी झालो आहोत. तसंच आरोपींना फाशी झाली पाहिजे ही आमची मागणी आहे. न्याय कुठल्या पद्धतीने देतील तो सरकारचा प्रश्न आहे. आमची मागणी आहे की आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट आम्ही लवकरच घेणार आहोत, किंवा ते आमची भेट घेतील.
कन्या वैभवी म्हणाली, आम्ही न्याय मागत आहोत, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. संतोष देशमुख यांची हत्या होऊन महिना झाला आहे. तरीही आरोपी पकडले जात नसतील तर आम्हाला न्याय कसा मिळणार? माझी विनंती आहे प्रशासनाला, की जे कुणीही आरोपींची मदत करत असतील, त्यांना या प्रकरणात सहआरोपी केले पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आमचा विश्वास आहे. त्यांनी आम्हाला सांगितले आहे की, न्याय मिळवून देऊ. आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा ही आमची अपेक्षा आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List