संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ राज्यातील ग्रामपंचायतींचा 9 जानेवारीला बंद

संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ राज्यातील ग्रामपंचायतींचा 9 जानेवारीला बंद

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणातील आरोपींवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी आणि देशमुख यांच्या कुटुंबीयांना कायमस्वरूपी संरक्षण देण्यात यावे अशी मागणी अखिल भारतीय सरपंच परिषदेने केली असून देशमुख यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी व घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी 9 जानेवारी रोजी महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायती बंद पाळतील अशी घोषणा आज केली.

अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या शिष्टमंडळाने संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. राज्यभरातले सरपंच मस्साजोगमधील घटनेमुळे हादरले आहेत. समाजसेवा करणे पाप आहे का, हा प्रश्न सरपंचांना पडला आहे. त्यामुळेच राज्यात परत कोणाचीही अशी हत्या करण्याची हिंमत होणार नाही अशा पद्धतीचे आरोपींना कडक शासन व्हावे, अशी मागणी सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. देशमुख कुटुंबाला आर्थिक मदत करावी, कुटुंबातील सदस्याला शासकीय नोकरी द्या, अशी मागणीही त्यांनी केली.

शनिवारी बीडमध्ये मूक मोर्चा

दोन आठवड्यांनंतरही संतोष देशमुख हत्येतील आरोपी सापडत नाहीत. त्याचा निषेध करण्यासाठी शनिवारी बीडमध्ये विराट मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी जिल्हाभरातून नव्हे, तर मराठवाड्यातूनही लोक बीडमध्ये दाखल होणार आहेत.

मंत्र्यांची रीघ… तरीही मारेकरी मोकाट

संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला. विधिमंडळात पाच दिवस या घटनेवरून धुमश्चक्री झाली. संजय शिरसाट, उदय सामंत, मेघना बोर्डीकर अशा मंत्र्यांनी गावात येऊन शोबाजी केली. उपमुख्यमंत्री अजित पवारही देशमुख कुटुंबाला भेटून गेले. एवढे असूनही या कुटुंबाला न्याय मिळालेला नाही. आरोपी मोकाट फिरत आहेत. पोलिसांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

आरोपी सापडत नसल्याने आरोप झाले. त्यानंतर पोलीस अधीक्षकांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. मात्र नवे पोलीस अधीक्षक येऊनही तपासात कोणतीही प्रगती नसल्याने पोलीस काय करत आहेत, असा सवाल उपस्थित होत आहे.

शोकाकुल कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी जिह्यासह राज्य आणि राज्याबाहेरूनही सामान्य माणूस मस्साजोगमध्ये येऊन धीर देत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही देशमुख कुटुंबाची भेट घेऊन घटनेवर चिंता व्यक्त केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

…त्यासाठी आधी काँग्रेसनं माफी मागावी, फडणवीस आक्रमक, थेट काँग्रेसचा इतिहासच काढला! …त्यासाठी आधी काँग्रेसनं माफी मागावी, फडणवीस आक्रमक, थेट काँग्रेसचा इतिहासच काढला!
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल  केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेसनं चांगलीच आक्रमक भूमिका घेतली. काँग्रेसकडून हाच मुद्दा पकडत...
परभणीत संविधानाची विटंबना करणाऱ्या ‘त्या’ आरोपीबाबत धक्कादायक खुलासा, समोर आली महत्त्वाची माहिती
‘पुष्पा 2’च्या दिग्दर्शकांकडून इंडस्ट्री सोडण्याची इच्छा व्यक्त; नेटकरी म्हणाले, अल्लू अर्जुन जबाबदार
कियाराला किस, आलियाच्या कमरेला स्पर्श.. त्या व्हिडीओंबद्दल अखेर वरुण धवनचं स्पष्टीकरण
मधुमेहाचा धोका टाळण्यासाठी ‘या’ सोप्या ट्रिक्स करा फॉलो…
वेगाने चाला रे बाबांनो… संशोधनातून बरंच काही आढळून आलंय; तुम्हालाही माहीत हवंच
मधुमेह वाढल्यामुळे त्रस्त आहात? स्वयंपाकघरातील ‘हे’ सुपरफूड्स तुमच्यासाठी ठरतील संजीवनी… एकदा नक्की करा ट्राय