ड्रग माफिया सुनील यादव याची कॅलिफोर्नियामध्ये हत्या, लॉरेन्स बिश्नोई गॅंगने घेतली जबाबदारी
ड्रग तस्कर सुनील यादव उर्फ गोलीची अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये हत्या करण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोई गॅंगचे गॅंगस्टर गोल्डी बरार आणि रोहित गोदारा यांनी जबाबदारी घेतली आहे. एकेकाळी सुनील यादवही लॉरेन्स बिश्नोई गॅंगचा भाग होता.
पाकिस्तानहून हिंदुस्थानात ड्रग्सची तस्करी करण्यासाठी सुनीलची मोठी भूमिका होती. तो अमेरिकेत मोठ्या प्रमाणात ड्रग तस्करीचे काम करत होता. दोन वर्षापूर्वी सुनील दिल्लीहून राहुल नावाच्या नकली पासपोर्टवर अमेरिकेला पोहोचला होता. नुकतेच राजस्थान पोलिसांनी सुनील यादवसाठी रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. शिवाय त्याच्या काही साथीदारांना एजन्सीच्या मदतीने दुबईत अटक केली होती. काही वर्षांपूर्वी सुनील यादवच्या 300 कोटी रुपयांच्या ड्रग्जची खेप हिंदुस्थानात पकडली गेली होती.
सुनील यादव हा मोठा ड्रग्ज तस्कर होता. पाकिस्तानातून माल आणल्यानंतर तो हिंदुस्थानात पुरवायचा. सुनीलच्या हत्येची जबाबदारी घेत लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या रोहित गोदाराने सोशल मीडियावर एक पोस्टही लिहिली आहे. त्यामध्ये त्याने लिहीले आहे की, सुनील यादवने पंजाब पोलिसांच्या मदतीने मिळून त्याचा भाऊ अंकित भाडू याचे एन्काऊंटर करण्यास मदत केली. सुनील यादव हा पंजाब पोलिसांचा गुप्तहेर असल्याचे लॉरेन्स गँगचे मत आहे. केंद्रीय यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनील यादवला राजस्थान पोलिसांनी गँगस्टर पंकज सोनी हत्येप्रकरणी अटक केली होती. त्याच्यावर राजस्थानमध्ये अनेक गुन्हे दाखल असून त्याची चौकशी सुरू आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List