मनालीमध्ये बर्फवृष्टीमुळे अटल बोगदा ठप्प, सुमारे 1000 हून अधिक वाहने अडकली
हिमाचल प्रदेशमध्ये प्रचंड बर्फवृष्टी होत आहे. यामुळे राज्यातील 30 आणि 2 राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आले आहेत. मनालीमध्ये बर्फवृष्टी आणि दाट धुके मुळे सोलंग नाल्यापासून अटल बोगद्यापर्यंत वाहतूक ठप्प झाली आहे. अटल बोगद्यात 1000हून अधिक वाहने अडकली. मनाली प्रशासनाने तात्काळ अटल बोगद्याजवळ दाखल होत वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
नाताळची सुट्टी असल्याने बर्फवृष्टीचा आनंद लुटण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक काश्मीर, शिमला, मनालीकडे वळतात. मोठ्या प्रमाणात पर्यटक मनालीतही येत असल्याने आधीच येथील रस्त्यांवर वाहनांची गर्दी झाली आहे. त्यातच बर्फवृष्टीमुळे येथील अनेक मार्ग बंद करण्यात आल्याने ही गर्दी अधिकच वाढली आहे. बर्फवृष्टीमुळे राज्यातील सार्वजनिक सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाल्या आहेत.
मनाली प्रशासनाने आतापर्यंत 700 वाहनांना अटल बोगद्यातून बाहेर काढल्याची माहिती मिळते. पोलिसांसह मनालीचे डीएसपी, एसडीएम आणि एसएचओ घटनास्थळी उपस्थित आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List