कोस्टल रोडवर आता चार मजली भूमिगत पार्किंग; एल ऍण्ड टीकडून नवीन आराखडा

कोस्टल रोडवर आता चार मजली भूमिगत पार्किंग; एल ऍण्ड टीकडून नवीन आराखडा

मुंबईकरांचा प्रवास वेगवान करणारा कोस्टल रोड पूर्ण क्षमतेने लवकरच सेवेत येणार असताना आता या ठिकाणी तब्बल चार मजली पार्पिंगची सुविधा करण्यात येणार असल्याचे पालिकेने जाहीर केले आहे. या ठिकाणी दुमजली पार्किंग सुविधा होणार होती. मात्र आता चार मजली सुविधा होणार असून विशेष म्हणजे ‘बेस्ट’च्या गाड्य़ांनाही या ठिकाणी पार्किंगची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. याबाबत एल अॅण्ड टीकडून प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराला नवीन आराखडा सादर करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अमित सैनी यांनी दिली.

मुंबईकरांचा प्रवास वेगवान करण्यासाठी प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी सी लिंक असा एकूण 10.58 किमी लांबीचा कोस्टल रोड बांधण्यात येत आहे. या कोस्टल रोडमुळे 40 मिनिटांचा प्रवास अवघ्या 9 ते 10 मिनिटांत होणार असून वेळेची 70 टक्के तर इंधनाची 34 टक्के बचत होणार आहे. या प्रकल्पात 175 एकर मोकळी जागा उपलब्ध होणार आहे. या ठिकाणी पालिका उद्यान, वॉपिंग मार्ग, पार्किंग अशा सुविधा तयार करणार आहे. प्रस्तावित रेसकोर्समधील सेंट्रल पार्कमध्ये येणाऱया पर्यटकांच्या बसगाडय़ांचे पार्किंगही हाजी अली पार्किंगमध्ये करण्याचे नियोजन असल्याने आराखडय़ात बदल करण्यात आला आहे. मार्च 2025 पर्यंत हे काम सुरू होणार आहे. यामध्ये हाजी अली येथील रजनी पटेल चौक येथे होणाऱया पार्किंगलगत बेस्ट बससाठी थांबाही दिला जाणार आहे. त्यामुळे हाजी अली दर्गा तसेच रेसकोर्समधील सेंट्रल पार्कमध्ये किंवा कोस्टल रोडजवळील नजारा पाहण्यासाठी मुंबईकर-पर्यटकांना सुविधा उपलब्ध होणार आहे.
अशी होणार पाकिंग सुविधा

कोस्टल रोड प्रकल्पात हाजी अलीच्या रजनी पटेल चौक येथे दुमजली भूमिगत पाकिंग, वरळीजवळ दोन वेगवेगळे भूमिगत पाकिंग आणि अमरसन्स येथे पाकिंग सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. तर वरळीमध्ये दोन ठिकाणी पाकिंगचे काम सुरू झाले आहे. हाजी अली येथील पाकिंगच्या कामाला अद्यापही सुरुवात झालेली नाही. हाजी अली येथे चारचाकी वाहनांसाठी दुमजली भूमिगत पाकिंगचा आराखडाही तयार करण्यात आला होता. या कामाला 2022 मध्येच मंजुरी मिळाली होती. मात्र न्यायालयीन प्रकरणामुळे हे काम रखडले होते, मात्र आता या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘या’ चुकांमुळे तुमच्या केसांची वाढ मंदावते, तज्ज्ञ उपाय जाणून घ्या ‘या’ चुकांमुळे तुमच्या केसांची वाढ मंदावते, तज्ज्ञ उपाय जाणून घ्या
केसांची वाढ योग्य पद्धतीने होणे हा अनेकांचा महत्वाचा विषय आहे. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात चुकीच्या खानपानामुळे आरोग्याबरोबरच केसांवर देखील त्याचे वाईट...
आता लाल परिसाठी नो वेटिंग…, गर्दीलाही टाटा बाय- बाय, परिवहन मंत्र्यांचा प्रवाशांसाठी मोठा निर्णय
पोलिसांच्या 35 टीम सैफच्या हल्लेखोराला मुंबईभर शोधत होत्या, तो मात्र फक्त शर्ट बदलून पोलीस ठाण्याबाहेरच भटकत होता
‘धरतीपुत्र नंदिनी’ फेम अमन जैस्वाल यांचा वयाच्या 22 वर्षी अपघातात मृत्यू
Garlic: तुपात शिजवून नियमित खा लसूण, मग पाहा चमत्कारीक फायदे
प्रसिद्ध अभिनेता अमन जैस्वालचे अपघाती निधन, जोगेश्वरी पुलावर बाईकला ट्रकने उडवले
छत्रपती संभाजीनगरमध्ये माणूसकीला काळीमा फासणारा प्रकार, अपघातातील मृतांचे दागिने चोरले