दोषी नव्हता मग वाल्मीक कराड फरार का होता? आमदार संदीप क्षीरसागर याचा सवाल
वाल्मीक कराडने बीडमध्ये दोन जातीत तेढ निर्माण केली आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला. तसेच दोषी नसताना वाल्मीक कराड इतके दिवस फरार का होता असा सवालही क्षीरसागर यांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर संदीप क्षीरसागर म्हणाले की, वाल्मीक कराडचा जर काही दोष नव्हता तर तो इतके दिवस फरार का होता असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केला. तसेच जोवर सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा निकाल लागत नाही तोवर धनंजय मुंडेंनी मंत्रीपद सोडावे अशी मागणीही क्षीरसागर यांनी केली.
आज मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. वाल्मीक कराडचे फोन डीटेल्स चेक केले जावेत आणि कराड ज्यांच्या संपर्कात होता त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी क्षीरसागर यांनी केली. जोवर या खटल्याचा निकाल लागत नाही तोवर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आम्ही केली. या खटल्याचा निकाल लागल्यानंतर मुंडे यांना पुन्हा मंत्रिपद द्या ही आमची मागणी सुरूवातीपासून आहे असेही क्षीरसागर म्हणाले.
वाल्मीक कराडने दोन जातीत तेढ निर्माण केली होती. बीडमध्ये एखादा अधिकारी आला तर त्याच्या नावापेक्षा त्याचे आडनाव पाहिले जाते.6, 9 आणि 11 डिसेंबरला कराडने कुणाला फोन केले आणि त्याला कुणाचे फोन आले याचा जरी तपास केला तरी यामागील मास्टरमाईंड आपल्यापुढे येतील असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List