थ्रेड लिफ्ट इनोव्हेशनवर विशेष कार्यक्रम
आरोग्य आणि सौंदर्य उपचार देणाऱ्या मिटोकॉन बायोमेडने अलीकडेच द हिल्टन, मुंबईसह दिल्लीमध्ये अॅप्टोस थ्रेड लिफ्टिंग तंत्रज्ञानाबद्दल कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमांचा उद्देश देशात अधिकाधिक लोकप्रिय होत असलेल्या नवीन पिढीच्या थ्रेड्सवर वैज्ञानिक दृष्टिकोन मांडून थ्रेड लिफ्ट तंत्रज्ञानाचा प्रसार करणे हा होता. या कार्यक्रमांमध्ये ऍप्टोस थ्रेड्सचे डॉ. जॉर्ज सुलेमॅनिड्झ, शरीरशास्त्राचे प्राध्यापक डॉ. डेनिज डेमिर्युरेक तसेच प्रख्यात प्लास्टिक सर्जन डॉ. कॉन्स्टॅटीन सुलेमानिडझे आणि मिटोकॉन बायोमेडचे व्यवस्थापकीय संचालक जिनांग धामी उपस्थित होते. कार्यक्रमात अॅप्टोस उपचार व सोल राइनोप्लास्टी उपचार पद्धतीचे लाइव्ह प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List