ब्राउन शुगर किंवा मध? वजन कमी करण्यासाठी कोणता पर्याय फायदेशीर

ब्राउन शुगर किंवा मध? वजन कमी करण्यासाठी कोणता पर्याय फायदेशीर

योग्य आहार न घेणे, फास्ट फूडचे अधिकतर सेवन यामुळे अनेकांना लठ्ठ्पणाच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे वजन कमी करणं हे मोठं आव्हान बनलं आहे. निरोगी आहार योजना आणि योग्य अन्न पर्याय निवडण्यासाठी, लोकं साखरेचे सेवन कमी करण्याचा प्रयत्न करतात किंवा काही चांगल्या पर्यायांसह डाएट बदलतात. ब्राउन शुगर आणि मध असे दोन पर्याय आहेत ज्यावर बऱ्याचदा चर्चा केली जाते, पण प्रश्न असा पडतो की, वजन कमी करण्यासाठी या दोन पर्यायांपैकी कोणता पर्याय अधिक फायदेशीर आहे?

आपल्या सर्वांना माहित आहे की रोजच्या आहारात जेव्हा साखरेचे प्रमाण अधिक होते तेव्हा वजन वाढण्यासोबत आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. म्हणूनच लोक त्यांच्या आहारात ब्राऊन शुगर किंवा मधाचा सेवन करण्यास सुरुवात करतात. ब्राऊन शुगर आणि मध दोन्ही नैसर्गिक पर्याय आहेत, जे नियमित साखरेपेक्षा आरोग्यदायी मानले जातात. परंतु ते तुमच्या शरीरावर कसा परिणाम करतात आणि वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत ते किती प्रभावी आहेत हे जाणून घेणे महत्वाचे आहे.

या लेखात आम्ही तुम्हाला ब्राऊन शुगर आणि मध हे वजन कमी करण्यासाठी कितपत फायदेशीर आहे हे जाणून घेण्याबरोबरच त्यांचे फायदे आणि तोटे काय आहेत? तसेच वजन कमी करण्यासाठी यापैकी कोणता पर्याय चांगला ठरू शकतो हे समजेल.

ब्राउन शुगर म्हणजे काय?

रिफाइंड साखरेमध्ये गूळ मिसळून ब्राऊन शुगर तयार केली जाते. ब्राऊन शुगर ही पांढऱ्या साखरेपेक्षा थोडे जास्त पोषण असते, कारण त्यात कॅल्शियम, पोटॅशियम आणि लोह सारखे खनिज घटक असतात. याचे बरेच फायदे आहेत जसे की, बारू साखरेमध्ये कमी कॅलरी असतात आणि नियमित साखरेपेक्षा खनिजे देखील कमी असतात. त्याचबरोबर त्याचे काही तोटेही आहेत जसे की, यात कॅलरीज खूप जास्त असतात, ज्यामुळे जास्त प्रमाणात सेवन केल्याने वजन वाढू शकते.

मध म्हणजे काय?

मध एक नैसर्गिक स्वीटनर आहे, यात जीवनसत्त्वे, अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, त्याचबरोबर मध हे पोषक तत्वांनी सुद्धा समृद्ध आहे. यामुळे मधाच्या सेवनाने तुमच्या आरोग्याच्या समस्या दूर होतात व निरोगी ठेवतात. याचे अनेक फायदे आहेत, तुम्ही जरा नियमित तुमच्या आहारात मधाचे सेवन केलात तर शरीरात पचनक्रिया सुधारते. तसेच चयापचय वाढविण्यास मदत करते, तर दुसरीकडे मधाचे काही तोटे देखील आहेत जसे की, जास्त प्रमाणात सेवन केल्याने कॅलरी वाढू शकतात आणि काही ब्रँडमध्ये प्रक्रिये दरम्यान मधातील पौष्टिक कमतरता देखील असू शकते.

वजन कमी करण्यासाठी कोणतं पर्याय उपयुक्त?

मधाच्या तुलनेत ब्राऊन शुगरमध्ये कॅलरी कमी असते, परंतु भरून शुगर बनवताना त्यात रिफाईंड केली साखर वापरल्याने वजन कमी करण्यासाठी ते तितकेसे उपयुक्त नसते. त्याच वेळी, मध नैसर्गिक आहे आणि कॅलरीमध्ये थोडे जास्त असू शकते, परंतु ते चयापचय वाढवण्यास मदत करते त्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते. जर तुम्ही पौष्टिकतेबद्दल बोललो तर मधात ब्राऊन शुगरपेक्षा अधिक पोषण आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि चयापचय सुधारते.

वजन कमी करण्यासाठी कोणता पर्याय फायदेशीर आहे?

वजन कमी करण्यासाठी ब्राऊन शुगरपेक्षा मध जास्त फायदेशीर आहे.कोमट पाण्यात लिंबाचा रस मिक्स करून त्यात सोबत मध मिक्स केल्यास फॅट बर्न होण्यास मदत होते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर ब्राऊन शुगर ही नियमित साखरेसारखीच असते, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी ती फारशी उपयुक्त ठरत नाही.

(डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Sunita Ahuja : रवीना टंडन आणि गोविंदाच्या नात्याबद्दल पत्नी सुनीता म्हणाली, ‘माझ्या आधी ती….’ Sunita Ahuja : रवीना टंडन आणि गोविंदाच्या नात्याबद्दल पत्नी सुनीता म्हणाली, ‘माझ्या आधी ती….’
बॉलिवूडचा स्टार गोविंदा आजही अनेकांना भावतो. त्याने आपला अभिनय आणि डान्सच्या माध्यमातून बरीच फॅन फॉलोईंग कमावली आहे. गोविंदाची पत्नी सुनीता...
मला श्रीदेवी आवडायची, त्यांची लेक आवडत नाही – राम गोपाल वर्मा थेट बोलले
वितरकांनो, दुचाकी खरेदीदारांना दोन हेल्मेट द्या
बहिणींना पैसे देणार नसाल तर त्यांचे मतही परत द्या, संजय राऊत यांनी फटकारले
आपवर हल्ले करण्यापेक्षा चीनला डोळे दाखवा, संजय राऊत यांनी भाजपला सुनावले
CRPF जवानांना नक्षलवाद्यांच्या तावडीतून सोडवणाऱ्या पत्रकाराची निर्घृण हत्या, सेप्टिक टॅंकमध्ये आढळला मृतदेह
Jasprit Bumrah – जसप्रीत बुमराहनं सामना सुरू असताना मैदान सोडलं; कोहली कर्णधार, नक्की झालं काय?