‘झुकेंगा नही साला…’ म्हणत पुन्हा नव्या जोशात दिसले विनोद कांबळी; रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज
टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांना प्रकृती खालवल्यामुळे ठाण्यातील अक्रीत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दहा दिवस उपचार घेतल्यानंतर त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. विशेष म्हणजे टीम इंडियाची 18 नंबरची जर्सी, डोळ्यांवर गॉगल आणि डोक्यात कॅप घालून अगदी पुष्पा स्टाईल मारत नव्या जोशाद त्यांनी रुग्णालयाला निरोप दिला आहे.
सचिन तेंडुलकर आणि वनोद कांबळी यांची मैत्री जगजाहीर आहे. त्यांच्या मैत्रिचे अनेक किस्से वेळोवेळी सांगितले जातात. डिस्चार्ज मिळाल्यानंतर सचिन तेंडुलकरसोबत पुन्हा एकदा प्रॅक्टिस करणार असल्याचे कांबळी यांनी म्हटले आहे. त्याच बरोबर नवीन वर्षाचे औचित्य साधत नागरिकांना व्यसनांपासून दुर राहण्याचा सल्ला सुद्धा कांबळी यांनी दिला आहे. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी डिस्चार्ज मिळाल्यामुळे विनोद कांबळी यांच्यामध्ये नवचैतन्य संचारलेले पहायला मिळाले. विशेष म्हणजे त्यांनी अंगावर टीम इंडियाची जर्सी, डोक्यावर टीम इंडियाची कॅप, डोळ्यांवर गॉगल घालून अगदी हटके स्टाईलमध्ये रुग्णालयातील सर्व स्टाफचा निरोप घेतला. तसेच त्यांचे आभार मानले.
विनोद कांबळी यांनी टीम इंडियाकडून खेळताना 17 कसोटी आणि 104 वनडे सामन्यांमध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधीत्व केले आहे. त्यांच्या या लहान पण झंझावती कारकिर्दीत कसोटी क्रिकेटमध्ये 1084 धावा आणि वनडेमध्ये 2477 धावा केल्या आहेत. तसेच दोन शतके आणि 14 अर्ध शतके सुद्दा ठोकली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List