दिग्दर्शक अनुराग कश्यपचा मुंबई अन् बॉलिवूड सोडण्याचा निर्णय; नव्या दिशेने वाटचाल
अनुराग कश्यप एक उत्तम दिग्दर्शक आहे. त्याने अनेक हीट चित्रपट दिले आहेत. बॉलिवूडमध्ये अनुराग कश्यपचे नाव खूप मोठे आहे. मात्र अनुराग कश्यपच्या एका निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला आहे. अनुरागने मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
अनुराग कश्यपचा मुंबई आणि बॉलिवूड सोडण्याचा निर्णय
बॉलिवूडमध्ये अनुराग कश्यपच्या नावाची आणि त्याच्या चित्रपटांची एक वेगळी ओळख आहे. काही काळापासून त्याला बॉलिवूडमध्ये त्याच्या मनासारखे काम करण्याची संधी मिळत नाहीये. यामुळेच अनुरागा मुंबई सोडून साऊथला शिफ्ट होण्याचा निर्णय घेत असल्याचं त्याने म्हटलं आहे.
अनुरागने स्वत: याबाबत खुलासा केल आहे. अनुरागला आता साऊथच्या चित्रपटांकडे वळण्याची इच्छा आहे. तसेच त्याला एक अभिनेता म्हणून स्वतःचा शोध घ्यायचा आहे. अनुरागने साऊथच्या चित्रपटांमध्ये काम करण्याचा त्याचा अनुभव बॉलिवूडपेक्षा वेगळा असल्याचं म्हटलं आहे. अनुराग कश्यपने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत याबाबत चर्चा केली आहे. या मुलाखतीदरम्यान त्याने बॉलिवूडच्या अभिनेत्यांबद्दलही बोलताना दिसला.
बॉलिवूडमधील चित्रपट निर्मितीचा उत्साह संपला
अनुराग कश्यपने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, बॉलीवूडमध्ये फक्त बिझनेस आणि मार्जिन बद्दल चर्चा होतात. चित्रपटांची विक्री कशी होईल याचा आधी विचार केला जातो. अशा परिस्थितीत बॉलिवूडमध्ये चित्रपट बनवण्याची मजाच संपते. यामुळेच अनुरागला आता मुंबई सोडून दक्षिणेत स्थायिक व्हायचं आहे. हे सर्व नव्या वर्षात करणार असल्याचं त्याने म्हटलं आहे. याउलट साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील लोक चित्रपट बनवण्यात खूप उत्साही असतात असही त्याने म्हटलं आहे.
अभिनेता उद्योगाला कंटाळा आहे?
अनुराग पुढे मुलाखतीत म्हणाला की, “मी बॉलिवूडला कंटाळला आहे आणि निराश आहे. बॉलिवूडमध्ये काही नवीन करण्याच्या विचार करून मी थकलो आहे. साऊथच्या ‘मंजुम्मेल बॉयज’सारखा चित्रपट बॉलीवूडला बनवता आलेला नाही. बॉलीवूड फक्त साऊथ आणि हॉलिवूडच्या चित्रपटाचे रिमेक बनवतात, त्यातही त्यांना काही नवीन करण्याची तयारी नसते.’अशापद्धतीने त्याने आपली बाजू मांडत बॉलिवूडपेक्षा टॉलिवूड त्यांच्यापद्धतीने चित्रपट बनवत असल्याचंही त्याने म्हटलं आहे.
स्टार ट्रिटमेंट ही एक समस्या
अनुराग कश्यपनेही बॉलीवूडमधील कलाकारांच्या वागणुकीबद्दल सांगितले आहे. तो म्हणाला, “हिंदी चित्रपटांतील प्रत्येक अभिनेत्याला स्टार ट्रिटमेंटची गरज असते. पण साऊथ इंडस्ट्रीत असे घडत नाही, तिथे मोठे कलाकारही चित्रपटातील इतरांप्रमाणेच वागतात.’ असेही त्याने सांगितले. दिग्दर्शक अनुराग कश्यपने अनेक हिंदी आणि साऊथ चित्रपटही केले आहेत. आणि ते प्रेक्षकांना प्रचंड आवडले आहेत. पण अनुरागच्या या निर्णयाने त्याचे चाहते नक्कीच नाराज झाले आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List