हिवाळ्यात आठवड्यातून किती वेळा केसांना तेल लावावं? जाणून घ्या फायदे…
हिवाळ्यात वातावरणातील थंडाव्यामुळे तुमच्या शरीरामध्ये अनेक बदल होतात. वातावरणातील बदलामुळे तुमच्या शरीरातील हार्मोन्स असंतुलित होण्यास सुरुवात होते. तुमच्या शरीरातील हार्मोन्स संतुलित करण्यासाठी तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. हिवाळ्यात अनेक आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे हिवाळ्यात तुमचं आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी त्याची विशेष काळजी घ्यावी लागते. आरोग्यासह हिवाळ्यात केसांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. हिवाळ्यामध्ये थंड वातावरमामुळे तुमच्या केसांमध्ये फ्रिझीनेस आणि कोरडेपणा दिसून येतात ज्यामुळे केस निर्जीव दिसू लागतात. केसांमध्ये ड्रायनेस असल्यामुळे त्यांचा लूक खराब दिसू लागतो.
हिवाळ्यामध्ये केसांममध्ये भरपूर प्रमाणात कोंडा होतो. हिवाळ्यात वातावरणातील ड्रायनेसमुळे तुमच्या स्कॅल्पची त्वचा ड्राय आणि निर्जीव होते. तुमची स्कॅल्प ड्राय झाल्यामुळे तुम्हाला कोंड्यासारख्या समस्या होतात. कोंड्यातील समस्यांमुळे तुम्हाला केसगळतीची समस्या उद्भवतात. केसांमधील कोंडा साफ करण्यासाठी तुम्ही त्यांच्यावर अनेक प्रयोग केले जातात. परंतु हिवाळ्यात केसांना तेल लावल्यामुळे तुमच्या केसांना नैसर्गिक मिळते. त्यासोबतच तेल लावल्यामुळे तुमच्या केसांना अनेक फायदे होतात.
हिवाळ्यात केसांना तेल लावण्याचे फायदे :
हिवाळ्यात थंड वातावरणामुळे तुमच्या स्कॅल्पवरील नैसर्गिक तेल कमी होते. स्कॅल्पवरील नैसर्गिक तेल कमी झाल्यावर कोंड्याची समस्या उद्भवू शकते. केसांमध्ये कोंडा झाल्यामुळे खाज सुटणे आणि केसगळतीची समस्या होऊ शकते. केसांना तेल लावताना केसांना मसाज केल्यामुळे तुमच्या केसांमधील कोंड्याची समस्या दूर होण्यास मददत होते. केसांना तेलाचा मसाज केल्यामुळे तुमच्या केसांच्या समस्या दूर होतात. त्यासोबतच केसांना तेल लावल्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते. केसांना तेल लावल्यामुळे केसांवर नेसर्गिक चमक येण्यास मदत होते. केसांना नियमित तेल लावल्यामुळे तुमच्या केसांना पोषण मिळण्यास मदत होते त्यासोबतच पांधऱ्या केसांची समस्या दूर होण्यास मदत होते.
केसांना तेल लावण्याचे फायदे जाणून घ्या :
केसांना तेल लावल्यामुळे तुमच्या स्कॅल्पवरील बॅक्टिरियाची वाढ होते.
केसांना तेल लावल्यामुळे रात्री चांगली झोप लागण्यास मदत होते.
केसांना आठवड्यातून दोन वेळा तेल लावल्यामुळे तुमच्या केसांची योग्य वाढ होते.
केसांना तेल लावल्यामुळे ते अधिक चमकदार आणि मऊ होतात.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List