छोटे कपडे घालण्यावर बंदी होती, सलमानच्या एक्सने केले धक्कादायक खुलासे
बॉलीवूड दबंग अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री संगीता बिजलानी यांचे प्रेमप्रकरण कोणापासून लपलेले नाही. एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले हे प्रेमीयुगुल लग्नही करणार होते. एवढेच नाही त्यांनी लग्नाच्या पत्रिकाही छापल्या होत्या. मात्र काही कारणाने त्यांचे लग्न होऊ शकले नाही. नुकतेच संगीता बिजलानीने सलमान खानबाबतचे धक्कादायक खुलासे केले आहेत.
संगीता बिजलानीने नुकतेच इंडियन आयडॉल या रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिने सलमान खानसोबतच्या नात्याबाबत अनेक खुलासे केले. हे बोलताना तिने कुठेही सलमानचे नाव घेतलेले नाही. पण तिचा रोख सलमानकडेच होता. यावेळी तिला एका स्पर्धकाने प्रश्न विचारला की, तुम्हाला तुमच्या करिअरमधील कोणता निर्णय बदलायला आवडेल? तसेच तुम्ही सलमान खानसोबत लग्न करणार होत्या, तुमच्या लग्नाचे कार्डदेखील छापण्यात आले होते? पण मग नेमकं काय घडलं? तुमचं लग्न का होऊ शकलं नाही? असे संगीताला विचारण्यात आले.
त्याच्या प्रश्नावर संगीतानेही मनमोकळेपणाने उत्तर दिले, ती म्हणाली, हो लग्नाचे कार्ड छापण्यात आले होते अशी कबुली दिली. शिवाय मला छोटे कपडे घालण्यासाठी बंदी होती. हे कपडे घाल ते घालू नकोस अशी बंधने घालायचा. सुरुवातील ते सगळं केलं. पण नंतर मात्र मी ते बंद केले. पुढे ती म्हणाली, मला आयुष्यातला तो भाग वगळायला आवडेल. पण खरं तर तो भाग बदलायचा नाही कारण मी आता स्वतंत्र आहे. असे तिने मनमोकळेपणाने उत्तर दिले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List