‘तारक मेहता..’मधील भिडे मास्तरांच्या लेकीने बांधली लग्नगाठ; पहा व्हिडीओ
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत भिडे मास्तरांची लेक सोनू भिडेची भूमिका साकारलेली अभिनेत्री झील मेहता नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. बॉयफ्रेंड आदित्य दुबेशी तिने लग्नगाठ बांधली असून या शाही लग्नसोहळ्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लाल रंगाच्या लेहंग्यामध्ये झील अत्यंत सुंदर दिसत असून तिला पाहून आदित्यसुद्धा भावूक झाला. 28 डिसेंबर रोजी झील आणि आदित्यचा लग्नसोहळा पार पडला. लग्नाच्या तीन दिवसांनंतर झीलने तिच्या इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर चाहत्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. आयुष्याच्या या नव्या प्रवासासाठी अनेकजण झीलला शुभेच्छासुद्धा देत आहेत.
झीलला पाहून आदित्य भावूक
लग्नाच्या व्हिडीओमध्ये झील तिच्या भावना व्यक्त करताना दिसतेय. “याआधी इतकी आनंदी मी कधीच नव्हते. माझ्या आनंदाला पारावार उरला नाही”, असं ती म्हणाली. तर झील जेव्हा नवरीच्या रुपात समोर आली, तेव्हा मनात काय भावना होत्या, याविषयी आदित्य म्हणाला, “जेव्हा ती माझ्यासमोर चालत आली, तेव्हा मला असं जाणवलं की जणू 14 वर्षांच्या आमच्या रिलेशनशिपमध्ये मी 10 वर्षे मागे गेलोय.” मे 2024 मध्ये झीलने आदित्यला प्रपोज करतानाचे फोटो पोस्ट केले होते. या फोटोंमध्ये ती त्याच्या बॉयफ्रेंडला लग्नासाठी प्रपोज करताना दिसून आली होती.
View this post on Instagram
A post shared by Priya Parikh | Wedding Content Creation (@sociallydreaming)
सोनू भिडेच्या भूमिकेमुळे झील लोकप्रिय
झीलने 2008 मध्ये ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत सोनू भिडेची भूमिका साकारली होती. 2012 पर्यंत ती या मालिकेत काम करत होती. त्यानंतर शिक्षण पूर्ण करण्यासाठी तिने ही मालिका सोडली. झील तेव्हापासून अभिनयक्षेत्रापासून दूरच आहे. ती सध्या स्टुडंट हाऊसिंग नावाची कंपनी चालवते. ती तिच्या आईसोबत ब्युटी बिझनेसमध्येही काम करते. तर झीलचा पती आदित्य हा गेमिंग इंडस्ट्रीत काम करतो. झीलने शिक्षण पूर्ण करण्यासाठी मालिकेचा निरोप घेतला होता. मात्र तिने साकारलेली सोनूची भूमिका आजही लोकप्रिय आहे.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेत आतापर्यंत बरेच कलाकार बदलले. मात्र जुने आणि नवे हे दोन्ही कलाकार प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरले. म्हणूनच झील आजसुद्धा सोनू भिडे या नावानेच चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List