21 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; निधी चौधरी, सोनिया सेठी यांना पदोन्नती
महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर प्रशासनात फेरबदल सुरू झाले आहेत. काही अधिकाऱयांना पदोन्नतीदेखील देण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने आज 21 सनदी अधिकाऱयांच्या पदोन्नतीचे आदेश जारी केले तर काही अधिकाऱयांची बदली करण्यात आली आहे.
सचिन प्रताप सिंह यांची शिक्षण आयुक्त, पुणे येथे नियुक्ती करण्यात आलीय. रुचेश जयवंशी यांना पदोन्नती देण्यात आली आहे. ते सध्या राष्ट्रीय ग्रामीण जीवनन्नोती अभियान, नवी मुंबई येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांना मंत्रालयात अल्पसंख्याक विकास विभागात सचिव पदावर नियुक्ती देण्यात आली आहे.
रवींद्र बिनवडे हे पुणे येथे नोंदणी महानिरीक्षक व नियंत्रक या पदावर काम करतील. रणजितसिंह देओल यांची प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय या पदावर, तर डॉ. अशोक करंजकर, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ या पदावर नियुक्ती झाली आहे.
सूरज मांढरे यांची आयुक्त कृषी, पुणे या पदावर नियुक्ती केली आहे. ते यापूर्वी क्रीडा व युवक सेवा विभागाचे सचिव म्हणून कार्यरत होते. प्रदीप पी. यांची मत्स्यव्यवसाय आयुक्त, मुंबई या पदावर नियुक्ती केली आहे. ते यापूर्वी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते.
सोनिया सेठी यांना अपर मुख्य सचिव म्हणून तर माणिक गुरसाळ यांना पदोन्नती मिळाली आहे. निधी चौधरी तसेच विमला आर यांनादेखील पदोन्नती देण्यात आली आहे. शीतल तेली-उगले, सोलापूर महापालिका आयुक्त पदावर पदोन्नती दिली आहे. महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघ, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक ए. बी. धुळाज यांना पदोन्नती देण्यात आली आहे.
डॉ. प्रशांत नारनवरे यांना सामान्य प्रशासन विभागात पदोन्नती
डॉ. प्रशांत नारनवरे यांची सामान्य प्रशासन विभागाच्या सचिव व विशेष चौकशी अधिकारी म्हणून मंत्रालयात नियुक्ती करण्यात आली आहे. महिला व बाल विकास विभाग, पुणेचे आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांना पदोन्नती देण्यात आली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List