मराठी माणसे घाणेरडी आहेत! मच्छी – मटण खातात!! कल्याणच्या उच्चभ्रू सोसायटीत परप्रांतीय अधिकाऱ्याची मुजोरी

मराठी माणसे घाणेरडी आहेत! मच्छी – मटण खातात!! कल्याणच्या उच्चभ्रू सोसायटीत परप्रांतीय अधिकाऱ्याची मुजोरी

धूप लावण्याच्या किरकोळ वादातून परप्रांतीय अधिकाऱयाने मराठी कुटुंबाला बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना कल्याणमध्ये घडली. तुम्ही मराठी माणसे घाणेरडी आहात, मच्छी-मटण खाता, बिल्डिंगमध्ये राहण्याची तुमची लायकी नाही, अशी गरळ ओकत अजमेरा हाईट्स या उच्चभ्रू सोसायटीत गुंड आणून दोन कुटुंबांना मारहाण केली. मराठी तरुणाचे डोके फोडून महिलेचा विनयभंग करण्यापर्यंत अखिलेश शुक्ला या माथेफिरू अधिकाऱयाची मजल गेली. कहर म्हणजे मी मंत्रालयात काम करतो, रोज 56 मराठी माझ्यासमोर झाडू मारतात, पोलीस मला घाबरतात, मुख्यमंत्री कार्यालयात एक फोन केला तर तुमच्या मराठीपणाची हवा निघून जाईल, अशी गरळ ओकणाऱ्या अखिलेश शुक्लावर कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी परस्परविरोधी फिर्याद नोंद केल्याने कल्याणमध्ये संताप व्यक्त होत आहे.

योगीधाम परिसरातील अजमेरा हाईट्स या उच्चभ्रू सोसायटीत अखिलेश शुक्ला राहतो. बुधवारी रात्री शुक्लाची पत्नी गीता हिने घराच्या बाहेर धूप लावला होती. लॉबीमध्ये दुर्घटना होऊ नये म्हणून बाहेर धूप लावताना काळजी घ्या, अशी विनंती शेजारी राहणारे अभिजित देशमुख आणि विजय कळवीकट्टे या कुटुंबीयांनी शुक्ला कुटुंबाला केली. मात्र ही विनंती म्हणजे शुक्लाला अपमान वाटला. त्याने थेट लता कळवीकट्टे यांच्याशी भांडण सुरू केले.

तुम्ही मराठी माणसे घाणेरडी आहात, बिल्डिंगमध्ये राहण्याची तुमची लायकी नाही, मटण, मच्छी खाता असे अद्वातद्वा बरळू लागला. यावेळी देशमुख कुटुंबाने हस्तक्षेप करत तुम्ही आम्हाला व्यक्तिगत बोला. महाराष्ट्रीयन माणसांचा अपमान करू नका, असे शुक्लाला बजावले. यावर शुक्ला याने तुमच्या मराठीपणाची हवा अर्ध्या तासात बाहेर काढतो, तुमचा मर्डरच करतो, अशी धमकी देऊन गुंड टोळीला फोन केला. यानंतर काही वेळातच आठ ते दहा गुंड हातात शस्त्रs घेऊन बिल्डिंगमध्ये आले. त्यांनी धीरज देशमुख, अभिजित देशमुख, विजय कळवीकट्टे यांना मारहाण केली. डोक्यात रॉड घालून अभिजित देशमुख यांचे डोके फोडले. तर शुक्ला याने माधुरी देशमुख यांचा विनयभंग केला. अर्धा तास गुंडांचा धुडघूस सुरू होता.

अखिलेश शुक्ला मंत्रालयात काम करतो. गाडीवर अंबर दिवा लावून कल्याणमध्ये फिरत असतो. शुक्लाच्या दहशतीमुळे सोसायटीत भीतीचे वातावरण आहे. तरीही खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी शुक्लासह देशमुख कुटुंबावरही गुन्हा दाखल केला. पोलीस शुक्ला याला पाठीशी घालत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Eknath Shinde Threat: शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना धमकी देणारा व्हिडिओ व्हायरल Eknath Shinde Threat: शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांना धमकी देणारा व्हिडिओ व्हायरल
Shiv Sena Leader Eknath Shinde Threat: शिवसेना नेता आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकी देण्यात आली आहे. ठाण्यातीलच श्रीनगर भागात...
मुंबईकरांना मिळणार सर्वत्र मेट्रो प्रवासाचा आनंद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय
बॉलिवूडमधील सर्वात बोल्ड गाणं; महेश बाबूच्या बायकोचा बाथरूममधील ‘तो’ सीन पाहाताच वाटते लाज, लोक बदलतात चॅनल
स्वतंत्र हिंदुस्थानात RBI ने सर्वातआधी जारी केली होती ‘ही’ नोट, जाणून घ्या नोटेवर कोणाचा छापण्यात आला होता फोटो
Affordable Maruti Brezza – मारुती ब्रेझाची किंमत होऊ शकते कमी, लहान इंजिनसह येईल नवीन मॉडेल
टीव्ही मालिका पाहून तांत्रिकाने दोघांचा काटा काढला, पण तिसऱ्याला संपवण्याच्या तयारीत असतानाच पर्दाफाश
उत्तरेकडील अतिशीत वारे राज्यात धडकणार; येत्या तीन दिवसात थंडीचा कडाका वाढणार