महिला वाढल्या तर दोन लग्न करण्याची परवानगी द्यावी लागेल
प्रत्येक एक हजार पुरुषांमागे दीड हजार स्त्रिया असतील तर पुरुषांना दोन लग्न करण्याची परवानगी द्यावी लागेल असे सांगताना, समाजात लिंग गुणोत्तराचा समतोल राखणे खूप आवश्यक आहे, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मांडले. समलिंगी विवाहामुळे समाजरचना संपुष्टात येईल. तसेच लिव्ह इन रिलेशनशिप ही संकल्पनाच चुकीची असून ती समाजाच्या नियमांच्या विरोधात असल्याचे गडकरी यांनी नमूद केले. ते एका मुलाखतीत बोलत होते.
मी लंडनमधील ब्रिटिश संसदेत गेलो होतो तेव्हा तेथील पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री यांना देशातील मोठय़ा समस्येबद्दल विचारले असता, येथील स्त्री-पुरुष विवाहात रस घेत नाहीत, ते लिव्ह इन रिलेशनशिपला प्राधान्य देतात, ही मोठी समस्या असल्याचे नितीन गडकरी म्हणाले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List